दहशतवाद्यांशी चकमक; दोन गोळ्या मांडीत घुसल्या, तरीही सहकाऱ्याला वाचविले; सांगली जिल्ह्यातील जवानाची शौर्यगाथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 15:38 IST2025-05-29T15:34:07+5:302025-05-29T15:38:13+5:30

जखमी सहकाऱ्याला खांद्यावर उचलले अन् वेदना सहन करीत डोंगरावरून तो खाली छावणीपर्यंत पोहोचला

Two bullets entered the thigh in an encounter with terrorists but still saved his colleague Bravery story of a soldier from Sangli district | दहशतवाद्यांशी चकमक; दोन गोळ्या मांडीत घुसल्या, तरीही सहकाऱ्याला वाचविले; सांगली जिल्ह्यातील जवानाची शौर्यगाथा

दहशतवाद्यांशी चकमक; दोन गोळ्या मांडीत घुसल्या, तरीही सहकाऱ्याला वाचविले; सांगली जिल्ह्यातील जवानाची शौर्यगाथा

महेश देसाई

कवठेमहांकाळ (जि. सांगली) : दहशतवाद्यांनी झाडलेल्या दोन गोळ्या मांडीत घुसल्या अन् तो रक्तबंबाळ झाला. सोबत असलेल्या सहकारी जवानाला छातीत गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. तिसऱ्या सहकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आणि दहशतवाद्यांचा गोळीबार सुरूच होता.

तरीही त्याने जखमी सहकाऱ्याला खांद्यावर उचलले अन् वेदना सहन करीत डोंगरावरून तो खाली छावणीपर्यंत पोहोचला. कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील येथील विनोद चव्हाण याची ही शौर्यगाथा तालुक्यात चर्चेचा विषय बनली आहे. चव्हाण व त्याचा जखमी सहकारी प्रदीप कुमार यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

कुकटोळी येथील विनोद सुनील चव्हाण (वय २६) हे सध्या जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्स, मराठा बटालियनमध्ये कार्यरत आहेत. त्यांचे वडीलही मराठा बटालियनमध्ये सैनिक होते. सध्या ते सेवानिवृत्त आहेत. जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात सिंगपोरा येथे संयुक्त सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत गुरुवारी, दि. २२ रोजी पहाटे ५ ते ६ वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. यावेळी जवान संदीप पांडुरंग गायकर हे शहीद झाले, तर कुकटोळी येथील विनोद चव्हाण व उत्तर प्रदेशमधील प्रदीप कुमार हे त्यांचे सहकारीही जखमी झाले.

दहशतवाद्यांना रोखण्यासाठी आणि ते पळून जाऊ नयेत, यासाठी घेराबंदी कडक करण्यात आली होती. डोंगरावर लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी संयुक्त दल जवळ येताच गोळीबार सुरू केला. यावेळी विनोदने ४८ गोळ्या झाडल्या होत्या. या चकमकीत विनोद यांना मांडीत दोन गोळ्या लागल्या होत्या, तर प्रदीप कुमार यांना छातीत एक गोळी लागली होती. दोघांवर जम्मू-काश्मीरमधील कमांडो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून, ते दोघेही सुखरूप आहेत.

Web Title: Two bullets entered the thigh in an encounter with terrorists but still saved his colleague Bravery story of a soldier from Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.