Sangli: सावंतपूर येथे अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात बारा शेळ्या ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 11:28 IST2025-07-11T11:27:42+5:302025-07-11T11:28:18+5:30
कुंडल: सावंतपूर (ता.पलूस) येथील नळवाडी भागात अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात बारा शेळ्या ठार झाल्या. बिबट्याने हल्ला केल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात ...

Sangli: सावंतपूर येथे अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात बारा शेळ्या ठार
कुंडल: सावंतपूर (ता.पलूस) येथील नळवाडी भागात अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात बारा शेळ्या ठार झाल्या. बिबट्याने हल्ला केल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सयाजी शिवाजी जाधव यांचा शेतात शेळ्यांचे शेड आहे. अनेक वर्षापासून शेतीपूरक म्हणून शेळ्यांचे पालन करुन ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गुरुवारी (दि.१०) नेहमीप्रमाणे ते शेतातून घरी गेले. आज, शुक्रवारी सकाळी शेतात गेल्यावर, त्यांना सर्व शेळ्या मृत अवस्थेत दिसल्या.
आसपास प्राण्याच्या पायांचे ठसे आढळले. या घटनेची माहिती त्वरित वनविभागाला दिली. तपासानंतरच नेमका हल्ला कोणी केला हे स्पष्ट होईल. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले.