शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक-कार धडकेत पलूसचे दोघे ठार

By admin | Updated: November 9, 2016 22:50 IST

आगळगाव फाट्यावर अपघात : देवदर्शनाहून परतताना दुर्घटना

ढालगाव : मिरज-पंढरपूर राज्यमार्गावरील आगळगाव (ता. कवठेमहांकाळ) हद्दीत ट्रक व कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पलूस येथील गणेश जितेंद्र कोळी (वय २१) व अशोक यशवंत कोळी (५४) हे दोघे जागीच ठार झाले. अपघातात अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी पहाटे दीडच्या सुमारास घडला. मिरज-पंढरपूर राज्यमार्गावर बुधवारी पहाटे दीडच्या सुमारास मालवाहतूक ट्रक (क्र. एमएच १४- ८०७१) हा सोलापूरच्या दिशेने निघाला होता, तर पलूस येथील कोळी कुटुंबीय तुळजापूर, अक्कलकोट देवदर्शन करून कारमधून (क्र. एमएच १० सीए ७४३९) पलूसला परतत होते. आगळगावच्या हद्दीत दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात गणेश व अशोक कोळी हे जागीच ठार झाले. अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. अपघाताची नोंद कवठेमहांकाळ पोलिसांत झाली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन वसमळे, संजय जाधव करीत आहेत. (वार्ताहर) अशोक कोळी शिक्षक मृत अशोक कोळी हे पलूस येथे शिक्षक होते. जखमींमध्ये सुवर्णा अशोक कोळी (वय ५३), संगीता राजेंद्र कोळी (४०) व साक्षी सुनील कोळी (१३) यांचा समावेश आहे.