आमणापूरच्या स्टेशनवर उद्यापासून गाड्या थांबणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 18:23 IST2023-01-18T18:23:22+5:302023-01-18T18:23:45+5:30

तालुक्यातील १५ ते २० गावातील प्रवाशांना या रेल्वे सेवेचा फायदा होणार

Trains will stop at Amnapur station from tomorrow | आमणापूरच्या स्टेशनवर उद्यापासून गाड्या थांबणार

आमणापूरच्या स्टेशनवर उद्यापासून गाड्या थांबणार

पलूस : आमणापूर (ता. पलूस) येथे झालेले नवीन रेल्वे स्टेशन उद्या, गुरुवार, दि. १९ पासून कायमस्वरूपी सुरू होत असून, या स्टेशनवर सकाळी साडेसात वाजता सातारा-कोल्हापूर व सायंकाळी ६.५५ वाजता कोल्हापूर-सातारा ही एक्स्प्रेस डेमू गाडी नियमितपणे थांबणार आहे, याबाबतचे  प्रशासकीय पत्र पुणे विभागाच्या महाप्रबंधक इंदुमती दुबे यांनी दिल्याची माहिती मध्य रेल्वे पुणेचे माजी सदस्य श्रीकृष्ण औटे यांनी दिली.

तालुक्यातील १५ ते २० गावातील प्रवाशांना या रेल्वे सेवेचा फायदा होणार असून रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. नव्याने सुरू होत असलेल्या स्टेशनवर पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस, कोयना एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस, महालक्ष्मी एक्स्प्रेस या गाड्या थांबण्यासाठी  खासदार संजय पाटील, भाजपचे जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज  देशमुख यांच्यामार्फत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही औटे यांनी सांगितले.

Web Title: Trains will stop at Amnapur station from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.