शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

मिरज-पंढरपूर मार्गावर प्रवासी भारमानाअभावी नव्या गाड्यांची प्रतिक्षाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 13:05 IST

सांगली : मिरज - पंढरपूर लोहमार्गावर छोट्या स्थानकात प्रवासी बुकिंग वाढविण्याचे आव्हान रेल्वे प्रशासनासमोर आहे. सध्या मोजक्याच गाड्या या ...

सांगली : मिरज - पंढरपूर लोहमार्गावर छोट्या स्थानकात प्रवासी बुकिंग वाढविण्याचे आव्हान रेल्वे प्रशासनासमोर आहे. सध्या मोजक्याच गाड्या या मार्गावर धावत आहेत. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च जास्त असल्याने गाड्यांची संख्या वाढण्यात अडचणी येत आहेत.प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेने थांबे रद्द केलेले नाहीत, मात्र तेथील स्थानकाची इमारत व कर्मचारी वर्ग काढून घेतला आहे. बेळंकीसह काही स्थानकांवर सध्या गाड्यांचे थांबे कायम आहेत. मात्र तेथे कर्मचारीवर्ग नाही. तिकिटांच्या विक्रीसाठी कंत्राटी कर्मचारी नेमले आहेत. मिरज-पंढरपूरसह मिरज पुणे मार्गावरही प्रवासी भारमान वाढविण्यासाठी रेल्वेचे प्रयत्न आहेत. प्रवाशांची संख्या वाढली नाही, तर नव्या गाड्या सुरु होण्यात अडचणी येऊ शकतात.सध्या मिरज-पुणे मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. आता त्यावरुन नवनव्या गाड्या सुरु होण्याची अपेक्षा आहे. विशेषत: दक्षिण भारताकडे व उत्तरेकडे धावणाऱ्या गाड्या वाढल्यास त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. सध्या कोल्हापूर-मिरज ते मुंबई मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्या हाऊसफुल्ल असतात. त्यामुळे गाड्यांची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे. मिरज ते पंढरपूर मार्गावर नेमके उलट चित्र आहे. प्रवासी संख्या वाढत नसल्याचे कारण देत नवीन गाड्या सुरु करण्यास प्रशासन असमर्थता दर्शवत आहे. कोल्हापूर - गुलबर्गा ही एक्सप्रेस सकाळच्या टप्प्यात सुरु झाल्यास उत्पन्न वाढणार आहे, मात्र तसा निर्णय रेल्वेने अद्याप घेतलेला नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Low-booking railway stops face cancellation; Miraj-Pandharpur route affected.

Web Summary : Railways will cancel stops with under 5% booking to save costs and time. Miraj-Pandharpur route will be affected. New rules impacting small stations necessitate increased local train services for passenger convenience.