शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रवाशांना वाटते कोरोना संपला, स्थानकात मास्क, डब्यात बेफिकिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:31 IST

रिॲलिटी चेक फोटो १६ संतोष ०२ सांगलीत रेल्वेत चढणाऱ्या प्रवाशांना मास्कचे भानच नसते लोकमत न्यूज नेटवर्क संतोष भिसे/सांगली : ...

रिॲलिटी चेक

फोटो १६ संतोष ०२

सांगलीत रेल्वेत चढणाऱ्या प्रवाशांना मास्कचे भानच नसते

लोकमत न्यूज नेटवर्क

संतोष भिसे/सांगली : लॉकडाऊन शिथिल होईल त्यानुसार रेल्वेंना गर्दी वाढत असल्याचे दिसत आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याने प्रवासी बेफिकीर बनत असल्याचेही दिसत आहे. कोरोनाच्या नियमांना डावलून विनामास्क गर्दी केली जात आहे.

सध्या फक्त एक्स्प्रेस गाड्याच धावत आहेत. पॅसेंजर बंद असल्याने एक्स्प्रेस गाड्यांना गर्दी होत आहे. स्थानकात प्रवाशांना मास्कची सक्ती आहे, गाडीत बसल्यानंतर मात्र ते बेफिकीर होत असल्याचे दिसत आहे. गाड्यांना गर्दी तर आहेच, शिवाय कोरोनाकडेही दुर्लक्ष केले जात आहे. रेल्वे सुरक्षा बलाचे जवान आणि तिकीट तपासणीस येतात, तेव्हाच मास्क नाकावर चढवला जातो. विशेष म्हणजे, रेल्वेतील खाद्यपदार्थ विक्रेतेदेखील कोरोना नियमांना धाब्यावर बसवत असल्याचेही दिसत आहे.

बॉक्स

विक्रेते बेफिकीर

मिरजेतून पुणे व बंगळुरू मार्गावर सध्या सर्वाधिक एक्स्प्रेस धावत आहेत. त्यामध्ये विक्रेत्यांची वर्दळही वाढली आहे. त्यांच्याकडून कोरोना नियमांचे पालन होताना दिसत नाही. मास्क नाकावर नसतात, शिवाय स्वच्छताही पाळली जात नाही.

बॉक्स

सर्रास गाड्यांत अशीच स्थिती

- यशवंतपूर-अजमेर एक्स्प्रेस, मिरज-यशवंतपूर राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसमध्ये आदी बारा एक्स्प्रेस सध्या धावत आहेत.

- सर्वच एक्स्प्रेसमध्ये कोरोनाविषयक एकसारखी अवस्था आहे. प्रवासी काळजी न घेताच गर्दी करत असल्याचे दिसते.

- विशेषत: एकाच कुटुंबातील प्रवासी असतील तर कोरोनाचे नियम उल्लंघनाचे प्रमाण जास्त आहे.

कोट

रेल्वेला गर्दी असली तरी कोरोनाविषयक काळजी घेतली जात आहे. स्थानकांवर सॅनिटायजर, सोशल डिस्टन्सिंग व मास्क सक्तीचा आहे. प्रवाशांनीही काळजी घ्यावी. विविध राज्यांत कोरोनाविषयक चाचण्या व लसीकरणाचे नियम आहेत, त्याचीही नोंद प्रवाशांनी घ्यावी.

मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी