मुलगी झाल्याने छळले, विवाहितेची आत्महत्या; सांगलीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 10:19 IST2024-06-26T10:19:36+5:302024-06-26T10:19:51+5:30
मुलगी झाली म्हणून सुनेच्या छळाचा प्रकार सांगलीमध्ये समोर आला आहे.

मुलगी झाल्याने छळले, विवाहितेची आत्महत्या; सांगलीतील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : मुलगी झाली म्हणून सुनेच्या छळाचा प्रकार सांगलीमध्ये समोर आला आहे. नेहमीच्या छळाला कंटाळून सुनेने आत्महत्या केली. याप्रकरणी डॉक्टर सासरा, पती व सासूविरोधात गुन्हे दाखल झाले. शीतल अनिकेत लेंडवे (वय ३४) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
याप्रकरणी शीतलचा भाऊ सूरज मधुकर सूर्यवंशी यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांकडून पती अनिकेत अशोक लेंडवे (४१), सासू अनिता आणि डॉ. अशोक लेंडवे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे अनेकांनी शोक व्यक्त केला असून, पोलिसांचा तपास सुरू आहे.