शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

रत्नागिरी-नागपूर महामार्गावर टोल वसुली; रस्त्याची कामे पूर्ण होण्याआधीच पथकर सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 15:58 IST

रस्त्याची कामे पूर्ण होण्यापूर्वीच पथकर सुरू

सांगली/शिरढोण : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरसांगली, नाझरे व इंचगाव येथे पथकर वसुली मंगळवारी (दि. १६) रात्रीपासून सुरू झाली. रस्त्याची कामे पूर्ण होण्यापूर्वीच पथकर सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.महामार्ग प्राधिकरणाने यासंदर्भातील अधिसूचना १५ ऑगस्ट रोजी जारी केली. त्याच रात्री तत्काळ वसुलीही सुरू झाली. २४ तासांचीही फुरसत दिली नाही. गेल्या वर्षभरात मिरज ते मोहोळदरम्यान टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरू होती. पण बरीच कामे अद्याप अपूर्णही आहेत. उड्डाणपूल, सेवारस्ते पूर्ण नाहीत. मिरज ते मालगाव हा सुमारे ३० किलोमीटरचा महामार्ग व सेवारस्ता अर्धवट आहे. तरीही पथकर सुरू झाला आहे. बोरगाव नाक्यावर ६५ किलोमीटर अंतरासाठीचा पथकर वसूल केला जाणार आहे.दरम्यान, बोरगावपासून पुढे ६० किलोमीटरवर सोलापूर जिल्ह्यातील नाझरे मठ येथे अनकढाळ नाकाही याच दिवशी सुरू झाला. ४९.२९१ किलोमीटर लांबीसाठी पथकर वसूल होईल. याला परिसरातील २० गावांचा विरोध असून, करमाफीची मागणी केली आहे. तालुक्याला म्हणजे सांगोल्याला जाण्यासाठी महिन्याला ३१५ रुपयांच्या पासचा भुर्दंड सोसावा लागेल, असा ग्रामस्थांचा आक्षेप आहे. अनकढाळपुढील इंचगाव नाक्यावरही वसुली सुरू झाली आहे.

प्रकल्प खर्च ७९४० कोटीसांगली ते सोलापूरदरम्यान महामार्गासाठी ७ हजार ९४० कोटी १ लाख रुपये खर्च आहे. त्याच्या वसुलीनंतर पथकर ४० टक्क्यांनी कमी केला जाईल, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

पथकर असा

  • कार, जीप, हलके वाहन - एकेरी ६५, दुहेरी १०० रुपये
  • मासिक पास (५० फेऱ्या) - २ हजार २४० रुपये
  • जिल्ह्यांतर्गत वाणिज्य वाहने - ३५ रुपये
  • हलके वाणिज्य वाहन, मिनीबस - एकेरी ११०, दुहेरी १६५, मासिक पास ३ हजार ६१५ रुपये
  • ट्रक, बस - एकेरी २२५, दुहेरी ३४०, पास ७ हजार ५७५ रुपये
  • व्यावसायिक एकेरी २५०, दुहेरी ३७०, पास ८ हजार २६५ रुपये
  • खोदकामाची उपकरणे, जड व्यावसायिक वाहने - एकेरी ३५५, दुहेरी ५३५, पास ११ हजार ८८० रुपये
  • अवजड वाहने - एकेरी ४३५, दुहेरी ६५०, पास १४ हजार ४६५ रुपये
  • नाक्यापासून २० किलोमीटरमधील बिगर व्यावसायिक वाहनांसाठी पास ३१५ रुपये. (महिन्याला एक हजारवेळा प्रवासाला मुभा)
टॅग्स :Sangliसांगलीtollplazaटोलनाकाhighwayमहामार्गnagpurनागपूरRatnagiriरत्नागिरी