शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

सातारा जिल्ह्यातील तिघा अट्टल चोरट्यांना विट्यात अटक, दहा लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 12:27 IST

घरफोड्या करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील तीन चोरट्यांना गजाआड करण्यात विटा पोलिसांना यश

विटा : सांगली जिल्ह्यातील विटा व तासगाव आणि सातारा जिल्ह्यातील उंब्रज व औंध पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील तीन चोरट्यांना गजाआड करण्यात विटा पोलिसांना यश आले. चोरट्यांकडून पोलीसांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, जीप यासह ९ लाख ७२ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.प्रतीक ऊर्फ नयन शंकर जाधव (वय २१, रा. वाघेश्वर, पो, मसूर, ता. कऱ्हाड), गौतम प्रकाश माळी (वय २१, रा. मायणी, ता. खटाव) व अनिकेत अधिकराव गायकवाड (वय २२, रा. निहीरवाडी-रहिमतपूर, ता. कोरेगाव) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.विटा (कदमवाडा) येथील संदीप हरिभाऊ शितोळे हे राहत असलेल्या अरुणा इमारतीतील खोली नं. ४ मध्ये दि. १३ फेब्रुवारी २०२२ रोजी मध्यरात्री घरफोडी करून या तिघांनी मौल्यवान वस्तूसह इलेक्ट्रॉनिक साहित्य लंपास केले होते. याप्रकरणी विटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.या गुन्ह्याचा तपास सुरू असताना या घरफोडीतील संशयित गौतम माळी व प्रतीक ऊर्फ नयन जाधव हे चोरटे कडेगाव येथील औद्योगिक वसाहतीत भाड्याने खोली घेऊन राहत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यावेळी पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम व निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक राजेंद्र भिंगारदेवे, अमरसिंह सूर्यवंशी, सुरेश भोसले, शशिकांत माळी, रोहित पाटील, सागर निकम, अक्षय जगदाळे, मारुती गायकवाड, उत्तम ओंबासे या पथकाने छापा टाकून त्या दोघांना अटक केली.चौकशीत त्यांनी साथीदार अनिकेत गायकवाड याच्या मदतीने औंध, उंब्रज, विटा व तासगाव हद्दीत घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यासाठी वापरलेल्या जीपसह सोने-चांदीचे दागिने व इलेक्ट्रॉनिक्स साहित्य, असा सुमारे ९ लाख ७२ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तिघांनाही अटक केली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीPoliceपोलिस