शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
3
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
4
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
5
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
6
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
7
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
8
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
9
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?
10
काँग्रेसच्या नेत्याने कार्यक्रमात म्हटलं बांगलादेशचं राष्ट्रगीत, भाजपा आक्रमक, काँग्रेसनं दिलं असं प्रत्युत्तर
11
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
12
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
13
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
14
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
15
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
16
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
17
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
18
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
19
"सर, ब्रेकअप झालंय" Gen Z कर्मचाऱ्यानं बॉसला पाठवला ईमेल; लगेच १० दिवसांची सुट्टी मंजूर, कारण..
20
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?

दिल्लीसाठी आजपासून तीन विशेष एक्स्प्रेस धावणार; सांगली, मिरजेत थांबा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 17:55 IST

उत्तर भारतात जाण्यासाठी प्रवाशांना गाडी उपलब्ध

सांगली/मिरज : दक्षिण-पश्चिम रेल्वेतर्फेदिल्लीला जाण्यासाठी दि.१६, १७ व २० रोजी तीन विशेष एक्स्प्रेस सोडण्यात येणार आहेत. या गाड्या मिरजमार्गे जाणार असल्याने उत्तर भारतात जाण्यासाठी प्रवाशांना गाडी उपलब्ध झाली आहे. सांगलीरेल्वे स्थानकाला यातील दोन गाड्यांचा थांबा मंजूर झाला आहे.म्हैसूर निजामुद्दीन विशेष एक्स्प्रेस गाडी (क्र. ०६५०५) दि. १६ रोजी सायंकाळी ७ वाजता म्हैसूर येथून सुटेल. दि. १७ रोजी सकाळी साडेदहा वाजता मिरजेतून व पुणे येथून सायंकाळी ४:२५ वाजता सुटेल. निजामुद्दीन येथे दि. १८ रोजी रात्री ११ वाजता पोहोचेल. बेंगलोर निजामुद्दीन एक्स्प्रेस (क्र. ०६५८५) बंगळुरू येथून दि. १७ रोजी सायंकाळी ७ वाजता सुटेल.मिरज येथून दि. १८ रोजी सकाळी साडेदहा वाजता सुटणार आहे. सायंकाळी ४:२५ वाजता पुणे येथून सुटेल. १९ रोजी रात्री ११ वाजता निजामुद्दीन येथे पोहोचेल. हुबळी निजामुद्दीन विशेष एक्स्प्रेस (क्र. ०७३२५) दि. २० रोजी रात्री ९:४५ वाजता हुबळी येथून सुटेल. दि. २१ रोजी पहाटे ३:१५ वाजता मिरज येथून व सकाळी ८:४५ वाजता पुणे येथून सुटेल. दि. २२ रोजी सकाळी ११:३० वाजता निजामुद्दीन येथे पोहोचेल.

सांगलीला दोन गाड्यांचा थांबाम्हैसूर-निजामुद्दीन गाडी (क्र. ०६२१५) व गाडी (क्र. ०६५८५) या दोन्ही गाड्या अनुक्रमे १७ व १८ सप्टेंबरला सकाळी ११:४५ वाजता सांगली स्थानकावर येतील. या गाड्यांची २ हजार तिकिटे उपलब्ध आहेत.

विशेष रेल्वेगाड्यांचा लाभ घ्यासध्या दिल्लीला नियमित जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल असल्याने तत्काळ तिकिटाची वाट पहावी लागणार नाही. या विशेष रेल्वेची आरक्षित कन्फर्म तिकिटे उपलब्ध असल्याने या विशेष रेल्वेगाड्यांचा कोल्हापूर, मिरज, सांगलीतील प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन मध्य रेल्वे क्षेत्रीय सल्लागार सदस्य सुकुमार पाटील यांनी केले आहे.

दिल्लीकडे जाणाऱ्या दोन विशेष रेल्वेंना सांगली स्थानकावर थांबा मंजूर झाला आहे. सांगली शहर व परिसरातील ग्रामीण भागातील प्रवाशांनी सांगलीतून पुढील प्रवासाचे बुकिंग करावे. - उमेश शहा, सांगली रेल्वे सल्लागार समिती.

टॅग्स :Sangliसांगलीdelhiदिल्लीrailwayरेल्वे