शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

Sangli : मुख्याध्यापकास मारहाण, तडसरच्या तिघांना एक वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 16:19 IST

शाळेत वाहने लावू नका म्हटल्याचा आरोपींना राग

सांगली : तडसर (ता. कडेगाव) येथील जिल्हा परिषद शाळेत बेकायदेशीर पार्किंग करू नका, असे सांगणाऱ्या मुख्याध्यापकांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी तिघांना एक वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी १८ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विटा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. भागवत यांनी हा निकाल दिला. जयपाल वसंत पवार, वैभव मुकुंद पवार, सागर मुकुंद पवार (रा. तडसर) अशी आरोपींची नावे आहेत. तडसर येथील जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात शेजारी राहणारे आरोपी जयपाल पवार, वैभव पवार, सागर पवार हे त्यांची दुचाकी थेट शाळेच्या व्हरांड्यात, तर चारचाकी पटांगणावर बळजबरीने लावत होते. विद्यार्थ्यांना अडथळा होत होता. दि. ६ मार्च २०१९ रोजी शाळा व्यवस्थापन समितीने शाळेच्या व्हरांड्यात व मैदानात वाहने लावू नयेत म्हणून ठराव घेतला होता. तसेच आरोपींना सूचना दिल्या होत्या.दि.२७ मार्च २०१९ रोजी मुख्याध्यापक भीमराव पवार यांना कडेपूर येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रशिक्षणाचे काम होते. सकाळी सात वाजता ते शाळेत आले. प्रार्थनेस विद्यार्थ्यांना वाहनांमुळे अडचण होईल, म्हणून मुलांमार्फत मालकांना बोलवून घेतले. वाहने बाहेर काढायला सांगून यापुढे वाहने लावू नका असे सांगितले. त्यामुळे तिघा आरोपींना याचा राग आला. सकाळी आठच्या सुमारास मुख्याध्यापक ऑफीसमध्ये होते. तेव्हा आरोपी जयपाल, सागर, वैभव हे ऑफीसच्या बाहेर आले. मुख्याध्यापकांना बाहेर बोलवले. तेव्हा ‘तू काय शाळेचा मालक झालास काय’ म्हणून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिक्षिकांनी आरडाओरड केल्यानंतर नागरिक गोळा झाले. तेव्हा तिघे निघून गेले. मारहाणीत मुख्याध्यापक पवार यांच्या बरगड्या मोडून, डोक्यात, छातीत व पाठीवर मुक्कामार लागला. सांगली, मिरज नंतर कराडमध्ये उपचार करण्यात आले. त्यांनी चिंचणी-वांगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.सरकारतर्फे या खटल्यात ॲड. रियाज जमादार यांनी आठ साक्षीदार तपासले. जोरदार युक्तिवाद केला. डॉक्टर व शिक्षिकांची साक्ष महत्त्वाची ठरली. त्यानुसार तिघा आरोपींना दोषी ठरवून शिक्षा दिली. पोलिस अधिकारी गणेश वाघमोडे यांनी तपास केला. त्यांना अमोल पाटील यांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :SangliसांगलीSchoolशाळाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस