शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाकडून तीन शाळकरी मुलींच्या विनयभंगाचा प्रकार, सांगली जिल्ह्यातील धक्कादायक घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 12:00 IST

कवठेमहांकाळ (जि. सांगली ) : कवठेमहांकाळ तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने नऊ वर्षांच्या तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची ...

कवठेमहांकाळ (जि. सांगली) : कवठेमहांकाळ तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने नऊ वर्षांच्या तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. संशयित भरत विश्वनाथ कांबळे (वय ४८, रा. सुभाषनगर, ता. मिरज) असे शिक्षकाचे नाव आहे. याबाबत पीडित मुलींच्या आईने कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचे संतप्त पडसाद गावात उमटले. पालक आणि संतप्त जमावाने शिक्षक कांबळेला चोप देत कवठेमहांकाळ पोलिसांच्या ताब्यात दिले.कवठेमहांकाळ तालुक्यातील एका गावातील वस्तीवर जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. इयत्ता चौथीच्या वर्गात शिक्षक भरत कांबळे शिकविण्यास होता. शाळेत शिकवत असताना मुलींबरोबर अश्लील वर्तन करत होता. दि. ४ ते ६ सप्टेंबरदरम्यान हा प्रकार घडला. पीडित मुलींनी हा प्रकार घरी सांगितला. सुरुवातीला पालकांनी दुर्लक्ष केले. परंतु, वारंवार हा प्रकार होत असल्याची माहिती पालकांना मिळाली. त्यामुळे पालक लक्ष ठेवून होते. सोमवारी चौथीच्या वर्गात शिकवत असताना शिक्षक कांबळे याने मुलींबरोबर अश्लील प्रकार सुरू केला. लक्ष ठेवून असलेल्या पालकांना हा प्रकार निदर्शनास आला.

तातडीने निलंबनशिक्षकाने विनयभंग केल्याची माहिती सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांना गटशिक्षणाधिकारी प्रमोद गोपणे यांनी दिली. तेव्हा धाेडमिसे यांनी तातडीने दखल घेत शिक्षक कांबळे याच्यावर निलंबनाची कारवाई केली.

टॅग्स :SangliसांगलीTeacherशिक्षकStudentविद्यार्थीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस