विजेचा धक्का लागून मायलेकासह तिघांचा जागीच मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 12:20 IST2018-03-31T09:40:50+5:302018-03-31T12:20:11+5:30

विजेचा धक्का लागून मायलेकासहीत तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वाळवा तालुक्यातील येलूर येथील ही घटना आहे.

Three people have died on the spot due to electric shock | विजेचा धक्का लागून मायलेकासह तिघांचा जागीच मृत्यू 

विजेचा धक्का लागून मायलेकासह तिघांचा जागीच मृत्यू 

सांगली : विजेचा धक्का लागून मायलेकासहीत तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वाळवा तालुक्यातील येलूर येथील ही घटना आहे. शनिवारी (31 मार्च) पहाटे  शेताला पाणी देण्यासाठी गेलेल असताना या तिघांना विजेच्या तारांचा धक्का लागला.
प्रभाकर महाडिक (वय 35),  छाया महाडिक (50 ) या मायलेकासहीत प्रकाश मगदूम (४५) या शेतमजुराचा मृतांमध्ये समावेश आहे.
ही दुर्घटना येलूर-कुरळप रस्त्यावरील महाडिक यांच्या शेतात घडली आहे. शेताला पहाटे पाणी देण्यासाठी प्रभाकर महाडिक आई छाया आणि त्यांच्याकडील मजूर मगदूम यांच्यासोबत शेतात गेले होते. मात्र तेथे विजेच्या खांबावरील तार तुटून पडलेली होती. अंधारात विजेची तार न दिल्यानं तिघांनाही विजेचा जोरदार धक्का लागला व जागीच तिघांचाही मृत्यू झाला. 

Web Title: Three people have died on the spot due to electric shock

टॅग्स :Deathमृत्यू