इस्लामपूरजवळ अपघातात एकाच कुटुंबातील तीन ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 05:54 IST2022-03-27T05:53:36+5:302022-03-27T05:54:02+5:30
शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता हा अपघात घडला.

इस्लामपूरजवळ अपघातात एकाच कुटुंबातील तीन ठार
लाेकमत न्यूज नेटवर्क
गोटखिंडी (जि. सांगली) : आष्टा-इस्लामपूर मार्गावर गाताडवाडी (ता. वाळवा) येथे दाेन माेटारींच्या धडकेत आगाशिवनगर (ता. कऱ्हाड) येथील एकाच कुटुंबातील दोन महिलांसह तिघे ठार झाले. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता हा अपघात घडला.
अधिकराव जगन्नाथ पोळ (वय ४९), गीताबाई जगन्नाथ पोळ (७०), सुषमा अधिकराव पोळ (४२, सर्व रा. पोळवस्ती, आगाशिवनगर) अशी मृतांची नावे आहेत. सरिता सुभाष पोळ (३५) व समृद्धी पोळ (७) या मायलेकींसह दुसऱ्या माेटारीतील दत्ता पांडुरंग गडदे (२५, रा. गुळवणी काॅम्प्लेक्स, सांगली. मूळ गाव पाच्छापूर, ता. जत), प्रकाश शेट्टी व साजीद अन्सारी जखमी झाले आहेत. वास्तुशांतीसाठी माेटारीतून सांगलीवाडी येथे निघाले हाेते. तीव्र वळणावर समाेर असलेल्या ट्रकच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात माेटारीवरील ताबा सुटला आणि पोळ यांची माेटार समाेरून येत असलेल्या माेटारीवर वेगाने आदळली.