शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मिरजेत देवीच्या मूर्ती विसर्जनावेळी तिघे बुडाले; दोघांना वाचविले, एकाचा शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 14:02 IST

कृष्णाघाटावर विसर्जनाची व्यवस्था करणार

मिरज : मिरजेत कृष्णाघाटावर सुभाषनगर येथील अंबिका नवरात्र मंडळाच्या दुर्गादेवीच्या मूर्तीचे नदीत विसर्जन करताना दोघा सख्ख्या भावांसह तिघे तरुण बुडाले. येथे शनिवारी रात्री ही दुर्घटना घडली. बुडालेल्यापैकी दोघांना वाचविण्यात यश आले, तर एक जण बुडाला. घाटावर महापालिकेने मूर्ती विसर्जनासाठी व्यवस्था केली नसल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला.अमित राजेंद्र गायकवाड (वय १९, रा. साई कॉलनी, सुभाषनगर, मिरज) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. लक्ष्मण मोरे (वय ४५) व अमोल गायकवाड (वय १५) यांना इतरांनी पाण्यातून बाहेर काढले. बुडालेल्या अमित याचा अमोल हा सख्खा भाऊ आहे. त्याच्यावर मिरोत शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आयुष हेल्पलाईन व महापालिका अग्निशमन दलाने यांत्रिक बोटीच्या साहाय्याने रविवारी सकाळपासून बुडालेल्या अमितच्या शोधासाठी मोहीम राबवली. सुभाषनगरमधील अंबिका मंडळाच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी शनिवारी रात्री आठ वाजता मंडळाचे कार्यकर्ते कृष्णाघाटावर गेले होते. नदीपात्रात विसर्जनासाठी महापालिकेने तराफा व अन्य कोणतीही सोय केली नव्हती, त्यामुळे कार्यकर्त्यांनी नदीत उतरून मूर्तीचे विसर्जन केले. सर्व जण काठावर आल्यावर मूर्ती पाण्यात तरंगत असल्याचे दिसले. त्यामुळे लक्ष्मण मोरे यांच्यासह अमोल व अमित गायकवाड हे तिघे पुन्हा पाण्यात गेले. मूर्ती पाण्यात ढकलताना त्यांचा तोल गेला. तिघेही बुडू लागले. पाण्याच्या वेगवान प्रवाहात गटांगळ्या खाऊ लागले. यावेळी अन्य तरुणांनी पाण्यात उड्या घेत दोघांना वाचविले. अमित मात्र बुडाल्याने सापडला नाही. रात्री बारा वाजेपर्यंत त्याचा शोध घेण्यात आला. त्यानंतर रविवारी सकाळी पुन्हा मोहीम राबविण्यात आली. दिवसभराच्या शोधानंतरही तो सापडला नाही. अमित याचे पालक, नातेवाईक व मंडळाचे कार्यकर्ते नदीकाठावर बसून होते. आयुष हेल्पलाइन पथकाचे अविनाश पवार, नरेश पाटील, निसार मर्चंट, दिलावर बोरगावे, चिंतामणी पवार, सूरज शेख, साहिल जमादार, प्रमोद जाधव, सिद्धार्थ रणखांबे व अग्निशामक दलाच्या जवानांकडून नदीपात्रात शोधकार्य सुरू होते.

कृष्णाघाटावर विसर्जनाची व्यवस्था करणारमिरजेतील सुमारे १०० सार्वजनिक मंडळांनी देवीची प्रतिष्ठापना केली होती. या मंडळाच्या मूर्तींचे विसर्जन गणेश तलावात होणार असल्याने नदीपात्रात विसर्जन व्यवस्था केली नव्हती. भविष्यात कृष्णाघाटावरही विसर्जनाची व्यवस्था करू, असे महापालिकेचे सहायक आयुक्त अनिस मुल्ला यांनी सांगितले. घाटावर बंदोबस्त ठेवला होता. मात्र, विसर्जन व्यवस्थेची जबाबदारी महापालिकेची असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू