शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

मिरज रेल्वेस्थानक परिसरात व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:28 IST

मिरज : मिरजेत रेल्वेस्थानक परिसरात व्यापाऱ्यांना लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी तिन्ही गुन्हेगारांना घटनास्थळी नेऊन त्यांची ...

मिरज : मिरजेत रेल्वेस्थानक परिसरात व्यापाऱ्यांना लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी तिन्ही गुन्हेगारांना घटनास्थळी नेऊन त्यांची धिंड काढली. त्यांचे दोघे साथीदार फरारी असून, त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत व्यापारी अविनाश प्रकाश रोहिडा यांनी गांधी चाैक पोलिसांत फिर्याद दिली आहे.

लूटमार करणाऱ्या रोहन राजाराम यादव (वय १९, रा. नदीवेस, मिरज), अझरुद्दीन नैरुद्दीन अबुफजल (वय ३२, रा. कोल्हापूर रोड, मिरज) व भाऊ उर्फ आसीफ शकील मुल्ला (वय २४, रा. मीरासाहेब दर्ग्याजवळ, मिरज) या तिघांना अटक केली. तर शोएब व एक अनोळखी असे दोघेजण फरारी आहेत. अटक केलेल्या तिघांना न्यायालयाने त्यांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मंगळवारी रात्री ९ वाजता पाच नशेखोरांनी रेल्वेस्थानक रस्त्यावर दुकानात जाऊन गॉगल, बेल्ट, चप्पल, कपडे असे साहित्य खरेदी केले. या साहित्याचे पैसे न देता शेजारच्या दुकानातून शेंगदाणे फुकटात घेतले. व्यापाऱ्यांनी पैशाची मागणी केल्यानंतर एका व्यापाऱ्यास मारहाण केली. एकाने चाकू दाखवून पैसे मागितल्यास भोसकण्याची धमकी दिली. सर्व जण रोहिडा याच्या मोबाइल दुकानात जाऊन काउंटरवर ब्लेडने वार केले. यामुळे व्यापाऱ्यांची धावपळ उडाली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रोहन, अझरुद्दीन, असिफ यांना घटनास्थळीच अटक केली, तर शोएब व अन्य एकाने पलायन केले.

अटक केलेल्या तिघांना घेऊन बुधवारी सकाळी पोलिसांनी तिघांकडून घटनास्थळी गुन्ह्याचे प्रात्यक्षिक केले. अटक केलेले सर्व जण सराईत चोरटे असल्याने पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली. दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांची धिंड काढून पोलिसांनी त्यांना चोप दिला.