सायरन वाजल्याने एटीएम फोडणारे चोरटे पसार; पण सीसीटीव्हीत कैद

By अविनाश कोळी | Published: November 12, 2023 08:34 PM2023-11-12T20:34:54+5:302023-11-12T20:35:32+5:30

आटपाडी : आटपाडी शहरातील बसस्थानक परिसरातील बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न झाला. यावेळी सायरन वाजल्याने ...

Thieves break ATMs with sirens; But caught on CCTV | सायरन वाजल्याने एटीएम फोडणारे चोरटे पसार; पण सीसीटीव्हीत कैद

सायरन वाजल्याने एटीएम फोडणारे चोरटे पसार; पण सीसीटीव्हीत कैद

आटपाडी : आटपाडी शहरातील बसस्थानक परिसरातील बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न झाला. यावेळी सायरन वाजल्याने चोरट्यांनीएटीएम सेंटरमधुन पलायन केले. ही घटना शनिवारी पहाटे घडली.

आटपाडीतील मुख्य बाजारपेठेमध्ये प्रवेश करत असताना सांगोला रोडलगत दोन बँकांचे दाेन एटीएम सेंटर आहेत. शनिवारी पहाटे दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या पाच चोरट्याने गॅस कटरच्या सहाय्याने मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र मशीन फोडत असतानाच एटीएमच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेला सायरन जाेरजाेराने वाजु लगला.

पैशाच्या बाजूचा असणारा एटीएम मशीनचा भाग कापण्याचा चाेरट्यांनी अयशस्वी प्रयत्न केला. सायरनच्या माेठ्या आवाजामुळे चोरट्यांनी शेटफळे चौक, पांढरेवाडीमार्गे पलायन केले. हा सगळा प्रकार आटपाडी पोलिसांनी लावलेल्या सीसीटीव्ही व एटीएम मशीनच्या सुरक्षेसाठी लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. चाेरट्यांनी एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही फोडण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही.

दरम्यान या घटनेने आटपाडी शहरामध्ये खळबळ उडाली आहे. शहरामध्ये प्रथमच असा प्रकार घडला आहे. पहाटेपासूनच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत फॉरेन्सिक तज्ज्ञांना पाचारण केले. ठसे तज्ज्ञानी एटीएम सेंटरमध्ये चाेरट्यांचे ठसे मिळाल्याचे सांगण्यात आले. याबाबत अधिक तपास सुरू आहे. चोरट्याने गॅस कटर दुचाकीवरून आणले होते. यामुळे चाेरटे सराईत असावेत असा अंदाज पाेलिसांनी वर्तविला आहे.
 

 

 

Web Title: Thieves break ATMs with sirens; But caught on CCTV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.