शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत ‘धूम स्टाइल’ने केलेल्या चोरीचा अवघ्या तासात छडा, चालकाने टीप दिल्याने साथीदाराकडून चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 16:24 IST

१५ लाखांचे दागिने जप्त, चर्चा मात्र ४० तोळ्यांची

सांगली : येथील कर्मवीर चौकातील पतसंस्थेच्या दारातून वृद्धाचे १३ तोळे सोन्याचे दागिने धूम स्टाइलने लंपास करणाऱ्या चोरट्यास अवघ्या तासाभरात विश्रामबाग पोलिसांनी गुरुवारी अटक केली. चालकानेच टीप दिल्यामुळे साथीदाराने दागिने चोरल्याचे तपासात स्पष्ट झाले. चोरटा अमोल महेश माने (वय ३०, रा. शिवपार्वती कॉलनी, हरिपूर, ता. मिरज) व चालक नितेश रामचंद्र गजगेश्वर (वय २९, रा. झाडातला मारुतीमागे, हरिपूर रस्ता, सांगली) या दोघांकडून १५ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.पाटबंधारे विभागातील निवृत्त अभियंता धनचंद्र भाऊराव सकळे (वय ८७, रा. कृष्णा हॉस्पिटलसमोर, पत्रकारनगर) यांनी लग्नकार्यानिमित्त कर्मवीर पतसंस्थेत ठेवलेले दागिने घरात आणले होते. १ मे रोजी सुटी असल्यामुळे शुक्रवारी ते दागिने पतसंस्थेच्या लॉकरमध्ये ठेवण्यासाठी मोटारीतून सकाळी १०:०० वाजेच्या सुमारास ते निघाले. तत्पूर्वी, मोटारीचा चालक नितेश गजगेश्वर याने सकळे यांना घेऊन दागिने ठेवण्यास पतसंस्थेत जायचे असल्याचे ऐकले होते. त्याने साथीदार अमोल माने याला टीप दिली. त्यानुसार अमोल माने हा दुचाकी (एमएच १० एएस ४९३५) वरून त्यांच्या मागावर होता.चालक नितेश याने सकाळी १०:१५ वाजता मोटार कर्मवीर पतसंस्थेसमोर थांबवली. सकळे त्यातून खाली उतरल्यानंतर नितेश मोटार पुढे घेऊन गेला. तेवढ्यात मागून आलेल्या अमोल माने याने सकळे यांच्या हातातील दागिन्यांची पिशवी हिसडा मारून ताब्यात घेतली. त्यानंतर काही सेकंदांत तो शंभरफुटीच्या दिशेने पळाला. सकळे यांनी आरडाओरड करून काही अंतरावर गेलेल्या चालक नितेशला थांबवले. त्यानंतर मोटारीतून त्यांनी चोरट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला; परंतु चोरटा पसार झाला होता.सकळे यांनी पतसंस्थेत येऊन हा प्रकार सांगितला. त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले. तत्काळ विश्रामबाग पोलिसांना प्रकार कळवला. उपअधीक्षक विमला एम., पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव आणि पथक घटनास्थळी दाखल झाले. तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. हा प्रकार टीप देऊन केला असल्याची शक्यता वाटल्याने चालक नितेशला ताब्यात घेऊन चौकशी केली. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासावरून अमोल माने याला ताब्यात घेतले. तेव्हा सर्व उलगडा झाला. दोघांनी मिळून कट रचल्याचे स्पष्ट झाले. चोरीचे दागिने अमोल याने मालवाहू टेम्पोमध्ये ठेवले होते. ते जप्त केले.प्रभारी अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भालेराव, सहायक निरीक्षक कविता नाईक, उपनिरीक्षक सुजाता भोपळे, कर्मचारी विशाल भिसे, संदीप साळुंखे, बिरोबा नरळे, अमर मोहिते, प्रशांत माळी, योगेश पाटील, आर्यन देशिंगकर, महंमद मुलाणी, गणेश बामणे, उमेश कोळेकर आदींच्या पथकाने कारवाई केली.

रेल्वे पोलिसमध्ये भरती होणार होताअमोल माने हा रेल्वे पोलिस दलात भरतीची तयारी करत होता. त्याने परीक्षा दिली होती; परंतु चारित्र्य पडताळणीमध्ये काही तांत्रिक अडचण निर्माण झाली. त्यामुळे त्याने ‘मॅट’मध्ये धाव घेतली होती. तत्पूर्वी, पैशाच्या अडचणीमुळे त्याने चोरी केली; परंतु पहिल्याच प्रयत्नात तो सापडला.

चर्चा मात्र ४० तोळ्यांचीसकळे यांना पत्नीने दागिने लॉकरमध्ये ठेवण्यास सांगितले होते. त्यामुळे ते दागिन्यांची पिशवी घेऊन बाहेर पडले; परंतु बरेच दागिने त्यांच्या पत्नीच्या अंगावर राहिले. दागिने चोरीस गेल्यानंतर त्यांना ४० तोळे दागिने गेले, असे वाटले. पोलिसांना तसे सांगितलेही; परंतु नंतर चौकशीत उर्वरित दागिने घरीच राहिल्याचे समजले.

टॅग्स :SangliसांगलीtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस