शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अलमट्टीमुळे सांगली, कोल्हापुरात महापूर नाही, ही शासनाची भूमिका - विशाल पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 14:26 IST

महापुराचे पाणी दुष्काळी भागात देण्यासाठी बोगद्याचा पर्याय

सांगली : कर्नाटकातील अलमट्टी धरणामुळे सांगली, कोल्हापुरात महापूर येत नाही, अशी राज्य शासनाची भूमिका आहे. या स्थितीत महापुराच्या अन्य कारणांचा शोध घ्यायला हवा, असे प्रतिपादन खासदार विशाल पाटील यांनी सांगलीत पत्रकार बैठकीत केले. महापुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवण्यासाठी कालव्यांचा पर्यायच व्यवहार्य नाही, त्यासाठी बोगदा किंवा अन्य उपायांचा विचार करायला हवा, असेही ते म्हणाले.खासदार पाटील म्हणाले, महापुराच्या कारणांच्या अभ्यासासाठी शासनाने वडनेरे समिती नेमली होती. समितीने अहवालात अलमट्टी धरणाला क्लिन चिट दिली आहे. हा अहवाल शासनाला मान्य आहे का ? असा प्रश्न आहे. अलमट्टीमुळे महापूर येत नाही अशी शासनाची भूमिका असल्यास नेमक्या कोणत्या कारणामुळे महापूर येतो? तो येऊ नये, म्हणून कोणती पर्यायी व्यवस्था शासनाने केली आहे? यंदा पूर आल्यास होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण ?, महापुराला जबाबदार नक्की कोण आहे?, असेही प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतात.

ते म्हणाले, वडनेरे समितीचा अहवाल कर्नाटक राज्यासाठी पोषक आहे. अलमट्टीमुळे महापूर येतो हे पुराव्यासह मांडण्यास महाराष्ट्र सरकार कमी पडले. वडनेरे समितीच्या अहवालाविरोधात शासनाने न्यायालयाचा दरवाजा अद्याप ठोठावलेला नाही. याचा अर्थ शासनाला तो मान्य आहे. अलमट्टीविरोधात भांडण्यात शासनाची भूमिका महत्त्वाची आहे. त्याची उंची वाढविण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. समितीचा अहवाल आम्हाला नाही. अलमट्टीमुळेच महापूर येतो, अशी पूरपट्ट्यातील नागरिकांची भावना आहे. त्यामुळे शासनाने समितीचे पुनर्गठन करावे.अहवाल पुन्हा घ्यावा. महापुराला कर्नाटक जबाबदार की महाराष्ट्र? हेदेखील जाहीर करावे.पाटील म्हणाले, महापूर आल्यानंतर त्याचे व्यवस्थापन करण्याऐवजी तो येऊच नये, यासाठी उपाययोजना आवश्यक आहेत. पावसाळ्यात कोयनेतून होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील विसर्गामुळे नदीच्या पाण्यात वाढ होते. पूरपट्ट्यातील बांधकामे हीदेखील समस्या आहे.खासदार पाटील म्हणाले, महापुराचे पाणी ताकारी, म्हैसाळ सिंचन योजनांद्वारे मराठवाड्याकडे वळवणे शक्य नाही. महापुराचे एक टक्का पाणीदेखील या योजना उचलू शकत नाहीत. त्याऐवजी कोयनेपासूनच बोगदा काढायला हवा. त्यातून पाणी माण खोऱ्यात न्यावे. केंद्रीय जल आयोगापुढे अलमट्टीविरोधात बाजू मांडण्यात महाराष्ट्र शासन कमी पडले. धरणात पाणीसाठा करण्याची परवानगी न्यायालयाने दिलेली नाही. महाराष्ट्र शासनाने रुरकी आयआयटी किंवा सबळ पुराव्यासह कर्नाटक शासनापुढे जायला हवे.

टॅग्स :SangliसांगलीKarnatakकर्नाटकDamधरणfloodपूरvishal patilविशाल पाटील