शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"माझ्यासारखे २४२ आमदार आहेत म्हणून तुझा मुख्यमंत्री आहे", शिंदेंसेनेचे आमदार बाबर यांचे विधान, भाजपा नेत्याला दिले चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 13:19 IST

Suhas Babar Devendra fadnavis: शिंदेसेनेचे खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी स्थानिक भाजपावर टीका करताना माझ्यासारखे २४२ आमदार आहेत म्हणून तुझा मुख्यमंत्री आहे असे विधान केले. 

Suhasa Babar News: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्ष एकमेकांना लक्ष्य करताना दिसत आहे. शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी भाजपाच्या स्थानिक नेत्यावर घणाघाती टीका करताना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बाण डागला. तुझ्या मुख्यमंत्र्याला जाऊन विचार, सुहास बाबर कोण आहे? असे म्हणत शिंदेंच्या आमदाराने भाजपा नेत्याला एक आव्हानही दिले. 

सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपा आणि शिंदेसेना यांच्यात जोरदार राजकीय वॉर सुरू आहे. भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्यावर प्रचारसभेतून टीका केली. 

खानापूर तालुक्यातील करंजे जिल्हा परिषद गटात येणाऱ्या पळशी गावात आमदार सुहास बाबर यांची प्रचारसभा पार पडली. त्यावेळी त्यांनी भाजपावर निशाणा साधला.  

"तुझ्या मुख्यमंत्र्याला विचार, सुहास बाबर कोण?"

आमदार सुहास बाबर टीकेला उत्तर देताना म्हणाले, "आधी काय सांगितलं की, सर्वात शेवटी मुख्यमंत्र्यांची असते. अरे तुझा मुख्यमंत्री माझ्यासारखे २४२ (आमदार) आहेत म्हणून मुख्यमंत्री आहे. एकदा जाऊन विचार तुझ्या मुख्यमंत्र्याला कोण आहे सुहास बाबर? त्याचं उत्तर तुला मुख्यमंत्री देतील." 

सुहास बाबर यांचे भाजपा नेत्याला आव्हान

"एवढं सोप्पं नाही. राजकारण जेवढं म्हणतात तेवढं सोप्पं नसतं. आज आम्ही २४२ फिरतोय त्याच्या अवतीभोवती. तुझा कोणताही नेता घेऊन जा आणि सुहास बाबर जाऊ दे. नाही मला आत घेतलं आणि तुझ्या नेत्याला बाहेर बसवलं, तर... तुझा तर संबंधच येत नाही", असे आव्हान आमदार बाबर यांनी भाजपाच्या स्थानिक नेत्याला दिले. 

"खानापूर-आटपाडीची भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना मीच चालवतो. मी दिसतो शांत, पण कार्यक्रम करायला लागलो, तर बघ. विट्यामध्ये मी काय केलं आहे, हे माहिती आहे का", असा इशारा आमदार सुहास बाबर यांनी भाजपा नेत्यांना दिला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde Sena MLA challenges BJP leader: 'Your CM exists because of us'

Web Summary : MLA Suhas Babar challenged a BJP leader, asserting his importance to the CM. He boasted influence, claiming to control local politics and daring the leader to a test of power. Babar warned of his capabilities.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMLAआमदारShiv SenaशिवसेनाSangliसांगलीZilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६