अंबिका स्टील सेंटर मध्ये २३ लाखाची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 13:38 IST2021-07-07T13:36:57+5:302021-07-07T13:38:19+5:30
Crimenews Sirala Sangli : शिराळा -चांदोली रस्त्यावर असणाऱ्या शेडगेवाडी फाटा येथील अंबिका स्टील सेंटर मध्ये २३ लाखाची चोरी झाली असून ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली असून घटनेची नोंद कोकरुड पोलिसात दाखल करण्यात आली आहे.

अंबिका स्टील सेंटर मध्ये २३ लाखाची चोरी
कोकरुड : शिराळा -चांदोली रस्त्यावर असणाऱ्या शेडगेवाडी फाटा येथील अंबिका स्टील सेंटर मध्ये २३ लाखाची चोरी झाली असून ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली असून घटनेची नोंद कोकरुड पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
शिराळा-चांदोली रस्त्यावर शेडगेवाडी फाटा या ठिकाणी जयंतीलाल ओसवाल यांच्या मालकीचे अंबिका स्टील या नावाने दुकान असून तेथून ते सळी, सिमेंट, फरशी अनेक प्रकारचे साहित्य विक्री व्यवसाय अनेक वर्षांपासून करत आहेत.तेथे ते लहान भावासह, पत्नी,दोन मुला सह दुकानाच्या वरती रहात होते.
मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ते दुकान बंद करुन सर्व कुटूंबियासह जेवण करण्यासाठी बाहेर केले होते. जेवण करुन दहाच्या सुमारास परत आले असता घराचे दरवाजे उघडे असल्याचे दिसताच आत जाऊन पाहिले असता कपाटात असणारी रोख रक्कम २३ लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले असल्याचे उघड झाले.
मंगळवारी रात्री उशिरा जयंतीलाल ओसवाल यांनी याबाबतची तक्रार कोकरुड पोलिसात दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ करत आहेत. दरम्यान बुधवारी सकाळी इस्लामपूर पोलीस उपविभागीय अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा करत अधिक तपासासाठी मार्गदर्शन केले आहे.