शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

सांगलीत उभे राहतेय दिमाखदार पोलिस मुख्यालय, महिन्यात काम पूर्ण होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 17:53 IST

सध्याच्या पोलिस मुख्यालयाच्या इमारतीला कोणताही धक्का न लावता ही इमारत उभारण्यात आली आहे.

सांगली : शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालयाची इमारतीपाठोपाठ आता दिमाखदार पोलिस मुख्यालयाच्या इमारतीमुळे वैभवात भर पडणार आहे. विश्रामबागला सुरू असलेले मुख्यालयाचे काम गतीने सुरू असून, अगदी महिनाभरात ही इमारत पूर्ण होणार आहे. इमारतीचे बांधकाम व अंतर्गत सजावट रचनेबरोबरच आता समोर बगीचाचे काम अहोरात्र सुरू आहे. विश्रामबागला असलेल्या पोलिस मुख्यालयाची इमारत जुनी झाल्याने नवीन इमारतीचा प्रस्ताव शासनाकडे दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दीड वर्षापूर्वी यास मंजुरी मिळून काम सुरू झाले. सध्याच्या पोलिस मुख्यालयाच्या इमारतीला कोणताही धक्का न लावता ही इमारत उभारण्यात आली आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्याला लागून आता मुख्यालय असणार आहे. विश्रामबाग चौकातून कुपवाड रस्त्यावरील उड्डाणपुलासमोरून मुख्यालयात प्रवेश करता येणार आहे. अधिकाऱ्यांसाठी दालनांसह सुविधानवीन इमारतीत पोलिस अधीक्षक, अप्पर अधीक्षक, गृह विभागाच्या उपअधीक्षकांसह इतर शाखांच्या उपअधीक्षक, पोलिस निरीक्षकांसाठी दालन असणार आहेत. सर्व विभागांचे कामकाज एकाच ठिकाणी व्हावे यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. भव्यदिव्य इमारतपोलिस मुख्यालयाची इमारत पुढील तीस वर्षांचा विचार करून बांधण्यात आली आहे. पाेलिस दलातील कर्मचारी संख्या वाढली, आस्थापनांची रचना बदलली तरी त्यासाठी इमारतीचा वापर होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासारखीच या इमारतीचीही रचना आहे. जागेचा वाद...मुख्यालयात असलेल्या हॉकी मैदानावर ही इमारत उभारण्यात आली आहे. क्रीडाप्रेमींचा त्याला विरोध होता. मात्र, नंतर तो मावळला. मुळात सांगली-मिरज मार्गावर दर्शनी भागातच ही इमारत असणे गरजेचे होते. अधीक्षकांचे निवासस्थान मुख्य रस्त्यावर आणि इतकी चांगली इमारत मात्र आतल्या बाजूला आहे.कोंडीची शक्यताविश्रामबाग चौकात वाहनांची नेहमीच गर्दी असते. उड्डाणपुलापासून चौकापर्यंत वाहनांच्या रांगा असतात. त्यात आता मुख्यालयाचे प्रवेशद्वार झाल्यास वाहतुकीची कोंडी वाढणार आहे. महाराष्ट्रदिनी लोकार्पणमहिनाभरात संपूर्ण इमारतीचे व समोरील सजावटीचे काम पूर्ण होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यानंतर लोकार्पण सोहळा होणार आहे. विलंब लागल्यास थेट महाराष्ट्रदिनी कार्यक्रमाची शक्यता आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिस