शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: नव्या वक्फ कायद्यातील दोन तरतुदींना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; सरकारकडून मागितलं उत्तर
2
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीच्या सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक, म्हणाले. "आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या…’’, 
3
ऑटोमॅटीक कार चालवत असाल तर लक्ष द्या; रक्ताच्या गुठळ्या, कार्डियाक अरेस्टचा धोका
4
"मी लग्न करेन, पण एका अटीवर..."; सासूसोबत पळून गेलेला जावई काय म्हणाला?
5
"३ महिन्यात निर्णय घ्या"; कोर्टाच्या निर्णयावर उपराष्ट्रपती नाराज, म्हणाले, "न्यायालय आदेश देऊ शकत नाही"
6
माझा आजचा दौरा जड अंतःकरणाने रद्द करावा लागतो आहे; कारण सांगत धनंजय मुंडेंनी दिली माहिती
7
हिंदी सक्तीवरून मनसे आक्रमक, आंदोलनाचा इशारा; नेते म्हणाले, “आमच्यावर भाषा लादू शकत नाही”
8
पंचांशी वाद घातल्याबद्दल मुनाफ पटेलला बीसीसीआयने ठोठावला दंड, दिल्ली- राजस्थान सामन्यात काय घडलंं?
9
२०३२ पर्यंत गुरुची अतिचारी गती: ९ राशींना गुरुबळ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; बक्कळ लाभ, भरभराट!
10
चीनच्या कंपनीने मारुतीच्या फ्राँक्सची कॉपी केली; 1200 किमी रेंजवाली एसयुव्ही लाँच केली
11
२०० रुपयांपर्यंतचे Jio, Airtel आणि Vi चे प्लान्स, मिळताहेत जबरदस्त बेनिफिट्स
12
"तुम मराठी लोग गंदा है...", घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी-गुजराती वाद, मनसैनिकांनी काय केलं पाहा...
13
सोन्याच्या दरात मोठी तेजी, पोहोचलं १ लाखांच्या जवळ, किंमत कमी होण्याची शक्यता आहे का? पाहा नवे दर
14
लोणावळा रेल्वे रुळाजवळ सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ!
15
IPL 2025: २५ दिवसांपूर्वी केलेली भविष्यवाणी आज काव्या मारनला हसवणार की रडवणार? प्रकरण काय
16
"एकनाथ शिंदेंच्या घरात शूटिंग केलं तेव्हा.."; क्षितीश दातेने सांगितला 'धर्मवीर'चा अनुभव
17
Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा कुबेर महाराजांची तसबीर आणि 'या' पाच भाग्यदायी वस्तू!
18
"स्क्रीनवर चांगली दिसण्यासाठी ती...", श्रीदेवीच्या मृत्यूबाबतीत बोनी कपूर यांचा धक्कादायक खुलासा
19
Dia Mirza : "तो सीन करताना मी थरथरत होती, मला उलटी झाली"; दीया मिर्झाने सांगितला शुटिंगचा अनुभव
20
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले दीड कोटी! आता बोनस शेअर्स आणि लाभांशाची लागणार लॉटरी

पुराचे संकट तूर्त टळले; सांगलीत कृष्णेची पाणीपातळी अर्ध्या फुटाने उतरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 13:59 IST

शिराळ्याव्यतिरिक्त जिल्हाभरात पावसाची विश्रांती

सांगली : सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी रविवारी दिवसभरात अर्ध्या फुटाने उतरली. दुपारनंतर ५ वाजता ३९.५ फूट पातळी होती. त्यामुळे पुराचे संकट तूर्त टळले असून, नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात शिराळ्याव्यतिरिक्त अन्यत्र पावसाने विश्रांती घेतली.जिल्ह्यात दिवसभर ढगांची गर्दी होती; पण दमदार पावसाने मात्र कोठेच हजेरी लावली नाही. शिराळा तालुक्यात मात्र पावसाचा जोर कायम आहे. वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढल्याने चांदोली धरणातून विसर्ग वाढवण्याची शक्यता धरण प्रशासनाने व्यक्त केली. पाऊस मंदावल्याने सध्या सुरू असलेला १६९७६ क्यूसेक विसर्ग कमी करण्याची तयारी सुरू होती, पण रविवारी पाऊस पुन्हा सुरू झाल्याने विसर्ग कमी करण्याचा निर्णय तात्पुरता स्थगित करण्यात आला. पावसाच्या प्रमाणावर पुढील सुधारित विसर्गाबाबत निर्णय होईल, असे प्रशासनाने सांगितले. शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात दिवसभर पावसाची उघडझाप सुरू होती. पुनवत परिसरात वारणा नदीची पाणीपातळी दुपारी १ वाजता १० फुटांनी उतरली होती.दरम्यान, पालकमंत्री सुरेश खाडे यांनी मिरजेत कृष्णा घाट व ढवळी येथील पूरस्थितीची पाहणी केली. जनावरांसाठी चारा वाटप केले. पूरबाधितांसाठी निवारा केंद्र, भोजन, आरोग्य सुविधा, पाणी आदींची आवश्यकतेप्रमाणे सोय करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, मिरजेच्या तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ, माजी आमदार उल्हास पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगलीfloodपूरriverनदी