शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेत प्रभाग समिती सभापतींचा कार्यकाल केवळ १८ दिवसांचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 18:42 IST

महापालिकेच्या इतिहासात असा अभूतपूर्व प्रसंग पहिल्यांदाच उद्भवल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली

सांगली : महापालिकेच्या चार प्रभाग समिती सभापती निवडी शुक्रवारी होणार आहेत. पण या सभापतींचा कार्यकाल एक वर्षाच नसून केवळ १८ दिवसांचा राहणार आहे. महापालिकेच्या अधिनियमातील तरतुदीनुसार नव्या आर्थिक वर्षात म्हणजे एप्रिल महिन्यात प्रभाग समितीची बैठक घेऊन नव्या सभापतींची निवड करण्याची तरतूद आहे. या अधिनियमामुळे नूतन सभापतींची अल्पकाळासाठी निवड होईल. त्यानंतर पुन्हा एप्रिल महिन्यात सभापती निवडी घ्याव्या लागणार आहेत. महापालिकेच्या इतिहासात असा अभूतपूर्व प्रसंग पहिल्यांदाच उद्भवल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.महापालिकेच्या स्थायी समितीसह सात विषय समितीच्या सभापतीपदासाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. त्यासाठी सकाळपासून सर्वच राजकीय पक्षांच्या सदस्यांत घाईगडबड उडाली होती. त्यात महापालिकेच्या चार प्रभाग समितीच्या सभापती निवडीचा समावेश होता. येत्या शुक्रवारी या निवडी होणार आहेत.तत्पूर्वी अर्ज दाखलच्या वेळी काँग्रेसचे नगरसेवक राजेश नाईक, भाजपचे माजी नगरसेवक राजू गवळी यांनी सभापतींच्या कार्यकाळाबाबत नगरसचिव सहदेव कावडे यांच्याकडे आक्षेप घेतला. महापालिकेच्या अधिनियमातील तरतुदीचा दाखलाही त्यांनी दिला. त्यामुळे एकीकडे अर्ज दाखलची घाई सुरू असताना प्रशासनाची तारांबळ उडाली.नगरसचिव कावळे यांनी आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर इचलकरंजी, कोल्हापूर महापालिकेशी संपर्क साधून माहिती घेण्यात आली. अखेर अधिनियमानुसार एप्रिल महिन्यात सभापतींच्या फेरनिवडी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता शुक्रवारी होणाऱ्या प्रभाग समिती सभापतींची मुदत केवळ १८ दिवसच राहणार आहे. ३१ मार्च रोजी त्यांची मुदत संपेल. त्यानंतर पुन्हा विभागीय आयुक्तांच्या आदेशाने नव्या सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. हा अभूतपूर्व प्रसंग पहिल्यांदाच समोर आल्याने प्रशासनाची कोंडी झाली होती.

अधिनियमात काय तरतूद?महापालिका अधिनियमातील २९ अ मधील (४) पोटकलम (२)च्या उपखंड (अ) मध्ये प्रभाग समित्यांचे सदस्य प्रत्येक सरकारी वर्षातील (आर्थिक वर्ष) पहिल्या सभेमध्ये त्यांच्यामधून सभापती निवडून देतील आणि तो लगतच्या सरकारी वर्षातील पहिल्या सभेपर्यंत ते पद धारण करील, अशी तरतूद केली आहे. यात सरकारी वर्ष म्हणजे १ एप्रिल ते ३१ मार्च असे गृहित धरण्यात आले आहे.

प्रशासनाची तांत्रिक चूक : संदीप आवटीप्रशासनाने निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यात अधिनियमातील तरतुदीनुसार आता पुन्हा एप्रिलमध्ये प्रभाग सभापती निवडी होतील. ही तांत्रिक चूक आहे. विभागीय आयुक्तांच्या मान्यतेनेच १३ रोजी निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला. यात भाजपचा संबंध काय. यासंदर्भात काँग्रेसने केलेले आरोप चुकीचे आहेत. याबाबत नगरसचिवांनी विभागीय आयुक्तांकडून मार्गदर्शन घ्यावे, अशी सूचना भाजपचे गटनेते तथा सभागृह नेते संदीप आवटी यांनी केली.

निवडीविरोधात कोर्टात जाणार : मंगेश चव्हाणसभापती निवडीसाठी सभा काढण्याची आवश्यकता असताना विशेष सभेचा अजेंडा काढला आहे. एवढी वर्षे सत्तेत असून भाजपला अजेंडा काढता येत नाही. त्यांचा कारभार बोगस सुरू आहे. सभापतींच्या निवडी पुन्हा करण्याची नामुष्की त्यांच्यावर आली आहे. निवडीचा अजेंडाचा चुकीचा असल्याने याविरोधात काँग्रेसकडून न्यायालयात दाद मागितली जाईल, असे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी सांगितले.

प्रभाग रचनाच चुकीची : राजेश नाईकसभापती निवडीसह प्रभाग समित्यांची रचनाच चुकीची करण्यात आल्या आहेत. याला काँग्रेसचा आक्षेप आहे. केवळ भाजपचा सभापती व्हावा, यासाठी खटाटोप केला आहे. प्रभाग १६ चा प्रभाग समिती दोनमध्ये समावेश केला आहे. वास्तविक या प्रभागातच प्रभाग समिती एकचे कार्यालय आहे. आता खणभागातील नागरिकांना तक्रारी घेऊन विश्रामबागला जावे लागेल. हा कुठला न्याय? याविरोधातही आम्ही आवाज उठवू, - राजेश नाईक, शहर जिल्हाध्यक्ष काँग्रेस

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Municipal Corporation: Ward Committee Chairmen Tenure Limited to 18 Days

Web Summary : Sangli Municipal Corporation's ward committee chairmen will have a mere 18-day tenure due to an administrative technicality. Fresh elections will occur in April, as per municipal regulations, creating an unprecedented situation. The short term has sparked controversy and accusations of administrative errors.