शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: शाळेच्या वेळेत आता शिक्षकांशी ‘नो कॉन्टॅक्ट’; मोबाइलला बंदी असणारी नेमकी शाळा कोणती.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 18:28 IST

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ

मालगाव : कोणत्याही शासकीय कार्यालयात कर्तव्य बजावताना मोबाइलचा वापर करू नये, असा अलिखित आदेश असतो. तरीही मोबाइलचा मोह सुटलेला नाही हे आपण नेहमी पाहिले आहे. शाळांमध्येही ही परिस्थिती नाकारण्यासारखी नाही. याला सिद्धेवडी (ता. मिरज) येथील जिल्हा परिषदेच्या माॅडेल शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक अपवाद ठरले आहेत. ज्ञानार्जनाच्या वेळेत सर्वच शिक्षक मोबाइलपासून दूर असतात. त्यामुळे शाळेच्या वेळेत त्यांचा संपर्क होत नाही. हा निर्णय कौतुकाचा ठरला आहे.मोबाइल ही संपर्काची सोय असली तरी कर्तव्याचे भान राहत नाही. मुख्यमंत्री माझी शाळा स्पर्धेत राज्य स्तराला गवसणी घातलेल्या सिद्धेवाडी (ता. मिरज) येथील जिल्हा परिषद माॅडेल स्कूलचे शिस्तप्रिय शिक्षक याला अपवाद ठरले आहेत. शाळा गुणवत्तेतही अग्रेसर राहावी, यासाठी शिक्षक ज्ञानार्जनाच्या कामाला जिद्दीने लागले. त्यांनी यासाठी मुख्याध्यापक विष्णू ओमासे यांच्या प्रेरणेतून शाळेच्या वेळेत मोबाइलपासून दूर राहण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. शाळेत आल्यानंतर हे शिक्षक आपला मोबाइल मुख्याध्यापकांकडे सोपवून वर्गात जातात. त्यामुळे शाळेच्या वेळेत या शिक्षकांशी संपर्क होत नाही.या शिस्तीचे चांगले परिणाम गुणवत्तावाढीत दिसत आहेत. गत शैक्षणिक वर्षात एन. एम. एम. एस. परीक्षेत ७ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले. यापैकी ५ विद्यार्थ्यांना ६० हजार रुपये व २ विद्यार्थ्यांना ४८ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर झाली. सध्या याच शाळेचे प्रज्ञाशोधमध्ये २००, पतंगराव सकाॅलरशिप इयत्ता ४ ते ७ चे ८०, मंथन शिष्यवृत्ती १२०, स्काॅलरशिप ५ ते ८ वीचे ५०, नवोदयसाठी १०, एन. एम. एम. एस. परीक्षेसाठी ३६ असे ३९६ विद्यार्थी सहभागी आहेत. क्रीडा स्पर्धेतही या शाळेचा लौकिक असतो. सध्या या शिक्षकांनी शाळेच्या वेळेत मोबाइल न वापरण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे पालक वर्गातून कौतुक होत आहे. शिक्षकांनी राबविलेला हा उपक्रम इतर शाळांनी घेण्यासारखा आहे.

विद्यार्थ्यांनाही भोंग्याने लावली शिस्तशाळेत एकीकडे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी स्वत:ला शिस्त लावली असताना, मुख्याध्यापक ओमासे व शिक्षकांनी स्वखर्चाने शाळेत भोंगा बसविला आहे. सकाळी ६, सायंकाळी ७ व रात्री ९ वाजता वाजणाऱ्या भोंग्याने विद्यार्थ्यांत अभ्यासाची शिस्त लावली आहे. याचे पंचायत समिती प्रशासनानेही कौतुक केले आहे.

टॅग्स :SangliसांगलीSchoolशाळाTeacherशिक्षकMobileमोबाइलzpजिल्हा परिषद