सांगली: शिवसेना तालुकाप्रमुखावर हल्ला; संशयितास पोलिसांनी घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 13:33 IST2022-10-15T13:32:45+5:302022-10-15T13:33:11+5:30

हल्ल्यानंतर लोक जमा झाल्याने हल्लेखोराने घटनास्थळावरून पलायन केले होते

The suspect who attacked Shiv Sena's Khanapur Taluka Pramukh has been detained by the police | सांगली: शिवसेना तालुकाप्रमुखावर हल्ला; संशयितास पोलिसांनी घेतलं ताब्यात

सांगली: शिवसेना तालुकाप्रमुखावर हल्ला; संशयितास पोलिसांनी घेतलं ताब्यात

विटा : शिवसेनेचे खानापूर तालुकाप्रमुख दादा ऊर्फ पांडुरंग आनंदराव भगत यांच्यावर लोखंडी गजाने हल्ला करणारा संशयित जावेद मुबारक आत्तार (वय ४१, रा. खानापूर) यास पोलिसांनी शुक्रवारी सकाळी ताब्यात घेतले. त्यास दुपारी विटा येथील तहसीलदारांसमोर हजर करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

खानापूर येथील जावेद आत्तार याने गुरुवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास जमिनीच्या वादातून शिवसेनेचे तालुकाप्रमुख दादा ऊर्फ पांडुरंग भगत यांच्यावर लोखंडी गजाने हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी भगत यांनी हल्लेखोराचा वार हातावर घेतल्याने मोठा अनर्थ टळला. त्यावेळी लोक जमा झाल्याने हल्लेखोर आत्तार याने घटनास्थळावरून पलायन केले होते. जखमी भगत यांच्यावर भिवघाट येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

याप्रकरणी हल्लेखोर आत्तार याच्याविरुद्ध रात्री उशिरा खानापूर दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संतोष डोके व उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रदीप पाटील यांनी शुक्रवारी सकाळी हल्लेखोर जावेद यास त्याच्या घरातून ताब्यात घेतले. दुपारी त्यास विटा तहसीलदारांसमोर हजर करून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

Web Title: The suspect who attacked Shiv Sena's Khanapur Taluka Pramukh has been detained by the police