शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कृष्णा नदीपातळीत मंदगतीने होतेय घट, पावसाचा जोर ओसरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 16:24 IST

येत्या सहा दिवसांत जिल्ह्याच्या बहुतांश भागात तुरळक पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.

सांगली : धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यातील बहुतांश भागात रविवारी पावसाचा जोर ओसरला. त्यामुळे कृष्णा व वारणा नदीच्यापाणीपातळीत मंदगतीने घट होऊ लागली आहे. दिवसभर पावसाची उघडझाप सुरूच होती.जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात सांगली जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ नोंदली गेली. गेल्या तीन दिवसांपासून धरण व नदी पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे कृष्णा व वारणा नदीकाठी निर्माण झालेली पुराची धास्ती आता दूर झाली आहे.येत्या सहा दिवसांत जिल्ह्याच्या बहुतांश भागात तुरळक पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे आठवडाभर कृष्णा व वारणा नदीपातळीत मोठी घट होण्याची शक्यता आहे.

धरणातून विसर्ग सुरूकोयना धरणातून सध्या २,१०० क्युसेक तर वारणा धरणातून १,८३८ क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दुसरीकडे कर्नाटकातील अलमट्टी धरणातून दीड लाख क्युसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीपातळीत येत्या दोन दिवसांत मोठी घट नोंदली जाण्याची शक्यता आहे.

कोयना धरण क्षेत्रात जोर ओसरला

कोयना धरण क्षेत्रात रविवारी सायंकाळी ५ वाजता १८ मिमी, तर वारणा क्षेत्रात ९ मिमी पाऊस नोंदला गेला आहे. शनिवारच्या तुलनेत या ठिकाणच्या पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.

कृष्णा नदीची पाणीपातळी (रविवारी सायं. ५ वा.पर्यंत)बहे ८ताकारी २०.५भिलवडी २०.५आयर्विन १९अंकली २४.९म्हैसाळ ३४.७

सांगली जिल्ह्यातील पाऊस मिमी (रविवारी स. ८ पर्यंत)मिरज ६जत १खानापूर-विटा ४.३वाळवा-इस्लामपूर ९.२तासगाव ५.५शिराळा १५.४आटपाडी २.५कवठेमहांकाळ ४.२पलूस ७.२कडेगाव ५

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसriverनदीWaterपाणी