शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

Almatti Dam: अलमट्टीतून विसर्ग वाढवला तरच पूरपरिस्थिती उतरेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 13:51 IST

अलमट्टी धरणात किमान १ लाख ७५ हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्या तुलनेत धरणातून पुढे विसर्ग सोडण्यात आलेला नाही. त्याचा परिणाम नृसिंहवाडी, कुरुंदवाड येथे पाण्याचा फुगवटा वाढला आहे.

सांगली : अलमट्टी धरण व्यवस्थापनाशी जलसंपदा विभागाने समन्वय ठेवला आहे, मात्र धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात धरणातून विसर्ग केला जात नसल्याचे निरीक्षण महापूर नियंत्रण  नागरी कृती समितीने नोंदविले आहे. सध्या दोन लाख क्युसेक पाणी सोडले जात असून आणखी किमान ७५ हजार क्युसेक सोडण्याची मागणी केली आहे.अलमट्टी धरण व्यवस्थापनाशी महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाने समन्वय ठेवला असून स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत धरणातील साठ्यावर लक्ष ठेवले जात आहे. धरणातील आवक आणि विसर्गामध्ये समन्वयासाठी पाठपुरावा केला जात आहे. यादरम्यान, समितीने यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठविले असून, अलमट्टीतून विसर्ग वाढविण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.पत्रात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती असून कोयना, चांदोली धरणातूनही पाणी सोडले जात आहे. त्याद्वारे अलमट्टीमध्ये किमान १ लाख ७५ हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्या तुलनेत धरणातून पुढे विसर्ग  सोडण्यात आलेला नाही. त्याचा परिणाम नृसिंहवाडी, कुरुंदवाड येथे पाण्याचा फुगवटा वाढला आहे. राजापूर बंधाराही पाण्याखाली गेला आहे. पाण्याचा निचरा गतीने होण्यासाठी अलमट्टीतून किमान २ लाख ७५ हजार क्युसेक गतीने विसर्ग आवश्यक आहे.

कृष्णेची फूग वाढणार अलमट्टीत सध्या १११.६४४ टीएमसी साठा आहे. तो कायम ठेवण्यासाठी विसर्ग दोन लाख क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. पण कृष्णेतून धरणात येणारे पाणी पाहता तो वाढविण्याची गरज आहे. कोयनेतील विसर्ग शुक्रवारी सकाळी वाढवला जाणार आहे, त्यामुळे कृष्णेची फूग वाढणार आहे. अलमट्टी धरणातील पाण्यावर  लक्ष ठेवण्यासाठी पाटबंधारेने निवृत्त अभियंत्याची नियुक्ती केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीfloodपूरKolhapur Floodकोल्हापूर पूरDamधरणWaterपाणी