शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीशी भेट होत नसल्याने नैराश्यातून शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय, सांगलीतील बेळुंखी येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 13:30 IST

पोलिसांच्या चौकशीत आत्महत्येमागील खरे कारण समजले

जत : प्रेयसी बाहेरगावी गेल्यामुळे तिची भेट होऊ शकत नसल्याच्या नैराश्यातून श्रीकांत आबासाहेब शिंगाडे (वय ३५, रा. बेळुंखी, ता. जत) या विवाहित शेतकऱ्याने विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली.श्रीकांत शिंगाडे विवाहित असून, गावात कुटुंबासोबत राहत होते. मंगळवारी रात्री शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला. जवळच कीटकनाशकाची बाटली पडली होती. नातेवाईकांनी पोलिसांना कळवले. शिंगाडे यांनी कर्जास कंटाळून आत्महत्या केली असावी, असा अंदाज पहिल्यांदा व्यक्त करण्यात आला होता. मात्र त्यांचे कोठेही कर्ज प्रकरण नसल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांच्या चौकशीत आत्महत्येमागील खरे कारण समजले.

शिंगाडे यांचे नात्यातीलच एका महिलेशी संबंध होते. मात्र ती बाहेरगावी राहण्यास गेल्याने तिची भेट होत नव्हती. त्यातून त्यांना नैराश्य आले होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.शिंगाडे यांचा मृतदेह मध्यरात्री विच्छेदनासाठी जत येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. पहाटे विच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा जत पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली. मृत श्रीकांत शिंगाडे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, लहान मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस