शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
2
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
3
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
4
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
5
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
6
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
7
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
8
EXCLUSIVE: अजित पवार-शरद पवार दोघेही एकत्र भाजपसोबत आले तर काय...? CM फडणवीसांनी दिलं उत्तर
9
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
10
२३४ पैकी ५६ जागा अन् ३ मंत्रिपदाची मागणी, शाहांनी आखली रणनीती; तामिळनाडूत भाजपाचं गणित काय?
11
ठाकरे माझे मतदार! मत मागण्यासाठी मातोश्रीवर पोहोचला शिंदेसेनेचा उमेदवार, सारेच अवाक्, त्यानंतर घडलं असं काही? 
12
दुसऱ्याची चूक आणि करोडपती झाला ट्रेडर, ४० कोटी आले खात्यात, पण प्रकरण गेलं कोर्टात, अखेरीस...
13
"त्याच रात्री मी फडणवीसांना म्हणालो, असे असेल तर मी राजकारणातून बाहेर पडतो", गणेश नाईकांनी सांगितलं प्रकरण काय?
14
एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असता; अमेरिकेत दोन भारतीयांनी केला 'हा' मोठा गुन्हा
15
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
16
"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..."
17
Realme चा धमाका! २००MP कॅमेरा, AI ची कमाल, दमदार फीचर्ससह पॉवरफुल स्मार्टफोन लाँच
18
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
19
२९ किलो सोनं, रोख रक्कम, DRI ने रॅकेटचा कार्यक्रम केला; कुठे झाली कारवाई, छाप्यात किती कोटी मिळाले?
20
Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Municipal Election 2026: भाजप नेत्यांची ऐक्य एक्सप्रेस ट्रॅकवर, मनोमिलन घडविण्यात नेत्यांना यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 19:05 IST

पालकमंत्र्यांचा वॉच

सांगली : महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या गर्दीमुळे भाजप सतत चर्चेत होता. त्याच वेळी पक्षाच्या अनेक नेत्यांमध्ये तीव्र मतभेद आणि स्पर्धा असल्याचेही सतत बोलले जात होते. परंतु, आता प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झाली आहे. सभा, प्रचार बैठका सुरू झाल्या आहेत. त्यावरून सर्व नेत्यांमध्ये ऐक्य घडवून आणण्यात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना यश आल्याचे दिसून येत आहे. विशेषतः हे मनोमिलन घडवून आणण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगण्यात येत आहे.सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात भाजपमध्ये अनेक वर्षे काम केलेले असंख्य नेते आणि कार्यकर्तेही आहेत. या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांचा प्रस्थापित नेत्यांबरोबर सततचा संपर्क असतो. याशिवाय पक्षाने स्वीकारलेल्या विस्ताराच्या धोरणानुसार गेल्या काही महिन्यांत काँग्रेसमधील अनेक मातब्बर नेते एकापाठोपाठ एक पक्षामध्ये आले. त्यांचे त्यावेळी स्वागत करण्यात आले; परंतु त्याही वेळी पक्षातील काही मातब्बर नेते नाराज असल्याची चर्चा ठळकपणे सुरू होती.

वाचा: पक्ष नाही, चिन्हच ओळख, अपक्षांमुळे प्रचारात रंगत; उरले सात दिवसआमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, माजी आमदार नितीन शिंदे, माजी आमदार दिनकर पाटील, मकरंद देशपांडे, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, पक्षाच्या महिला आघाडीच्या नेत्या नीता केळकर, प्रकाश बिरजे, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार असे नेते पक्षाच्या उभारणीपासून ते पक्षाच्या विस्तारापर्यंत सातत्याने काम करीत आले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर काही महिन्यातच सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील, सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज पाटील या दोघांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. त्यांच्याबरोबर मोठ्या संख्येने कार्यकर्तेही पक्षात आले. त्यामुळे मोठी खळबळ उडणे साहजिक होते. तशी खळबळ उडालीही होती.अगदी जुने, मधील काळात पक्षात येऊन कार्यरत झालेले आणि अगदी अलीकडे पक्षात आलेले अशा सर्व नेत्यांच्या ऐक्याची खरी कसोटी महापालिका निवडणुकीतच लागणार होती हे स्पष्ट होते. आमदार गाडगीळ सांगली विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले आहेत. आमदार खाडे मिरज विधानसभा मतदारसंघातून चार वेळा निवडून आले आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांच्या निवडणूक प्रचारात अग्रेसर राहून सहभाग घेणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. पक्षात नव्याने आलेल्या जयश्री पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांच्या अनेक समर्थक कार्यकर्त्यांनाही उमेदवारीची अपेक्षा होती.मुळात भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी सर्वच वीस प्रभागांत रस्सीखेच सुरू होती. मात्र जागा ७८ आणि इच्छुकांची संख्या प्रचंड यामुळे नेत्यांपुढे मोठा पेचप्रसंग उभा राहिला होता. याशिवाय काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक माजी नगरसेवक होते.या सगळ्या वातावरणातच पक्षाच्या उमेदवारांची निश्चिती करण्यात आली. ती करताना सगळीकडे शक्य तेवढा समतोल साधण्याचा प्रयत्न पक्षाने केला आहे असे एकंदर चित्र दिसते आहे. अर्थात उमेदवारीची अपेक्षा असलेल्या अनेकांची निराशा होणेही साहजिक होते; परंतु त्यापैकी काही अपवाद वगळता बहुसंख्य कार्यकर्ते नाराजी बाजूला ठेवून आता पक्षाच्या प्रचारात सहभागी झाल्याचे चित्र आहे.पक्षाकडे उमेदवारी मागणारे आणि ती मिळाली नसली तरी पक्षाच्या कामात सहभागी होणारे कार्यकर्ते हे चित्र एकीकडे निश्चितच आहे. मात्र उमेदवार यादी निश्चित करताना नेत्यांमध्ये बरेच वादविवाद, मतभेद झाले, अशी अशी सतत चर्चा सुरू होती. त्यामुळे या सर्व नेत्यांचा प्रत्यक्ष प्रचारामध्ये कसा सहभाग आणि व्यवहार राहतो याकडे सर्वांचेच बारकाईने लक्ष होते.

व्यासपीठावर आले एकत्रउमेदवार जाहीर झाल्यानंतर पहिल्याच नियोजनाच्या बैठकीत पक्षाचे सर्व नेते व्यासपीठावर उत्साहाने हजर असल्याचे चित्र दिसत होते. एवढेच नव्हे तर ज्या नेत्यांमध्ये मतभेद असल्याची सतत चर्चा होती, तेसुद्धा परस्परांमध्ये सुसंवाद करताना दिसून येत होते. प्रचार कार्यालयाचे उद्घाटन, प्रचाराचा प्रारंभ, प्रचारफेरी, बैठका असे उपक्रम सुरू आहेत. या सर्व उपक्रमांमध्ये पक्षाचे नवे, जुने नेते आणि कार्यकर्ते एकत्र आल्याचे चित्र दिसून येत आहे.

पालकमंत्र्यांचा हालचालींवर वॉचभाजपचे ज्येष्ठ नेते आणि पालकमंत्री पाटील यांचे या संपूर्ण निवडणुकीच्या नियोजनावर आणि प्रचारावर लक्ष दिल्याचे चित्र आहे. राज्यातील तसेच पुण्यातील निवडणुकीचीही त्यांच्यावर जबाबदारी आहे. तरीही सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीकडे ते बारकाईने लक्ष देत आहेत असे पक्षाचे नेते सांगत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli BJP United for 2026 Election: Leaders Bridge Differences Successfully

Web Summary : Sangli BJP unites for the municipal election after internal disputes. Senior leaders, including Fadnavis and Patil, played crucial roles in reconciling differences among old and new members. Focus is now on campaigning with all leaders actively participating.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपाguardian ministerपालक मंत्रीChief Ministerमुख्यमंत्री