शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

Election: तासगावात महाआघाडीचा पेच, त्याआधीच उमेदवारीची रस्सीखेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 18:30 IST

राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना हे आघाडी करून लढणार का? याबाबत अद्याप चित्र स्पष्ट नाही.

दत्ता पाटीलतासगाव : प्रभागातील आरक्षण जाहीर केल्यानंतर तासगाव नगरपालिकेसाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. नगरपालिकेत ‘एन्ट्री’ होणारच, या आत्मविश्वासाने इच्छुक कामाला लागले आहेत. भाजप स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट आहे. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटकपक्ष असणारे राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना हे आघाडी करून लढणार का? याबाबत अद्याप चित्र स्पष्ट नाही. आघाडीचे पेच सुटण्याआधीच या पक्षांतील इच्छुकांनी उमेदवारीसाठी गुडघ्याला  बाशिंग बांधून रस्सीखेच सुरू केली आहे.भाजप खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली पालिकेचे रणशिंग फुंकणार आहेत, हे स्पष्ट आहे. भाजपमध्ये काही प्रभागात प्रस्थापित तत्कालीन नगरसेवकांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे, तर काही प्रभागात इच्छुकांचा भरणा जास्त आहे. मात्र भाजपात खासदारांचा आदेश अंतिम ठरणार आहे.राज्यात सत्तेत आल्यापासून राष्ट्रवादीतही उत्साहाचे वातावरण आहे. यावेळी सत्तेत येणारच, अशा अविर्भावात राष्ट्रवादीचे नेतृत्व असल्यामुळे इच्छुकांचा भरणा मोठा आहे. उमेदवारीसाठी राष्ट्रवादीतदेखील मोठी रस्सीखेच होणार आहे. मात्र गतवेळी काँग्रेसच्या मतविभागणीचा फटका राष्ट्रवादीला बसल्यामुळे आणि यावेळीदेखील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी जोरदार तयारी सुरू केल्यामुळे राष्ट्रवादीसमोर पेच निर्माण झाला आहे.राष्ट्रवादी मतविभागणी टाळण्यासाठी काँग्रेस व शिवसेनेसोबत जुळवून घेणार, की एकला चलो... चा नारा देणार, यावर पालिकेची पुढील समीकरणे अवलंबून आहेत. आघाडीचा पेच सुटण्याआधीच सर्वच पक्षांच्या इच्छुकांनी सोयीस्कर मतदार संघात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.तीन पक्षांचा तिढा सुटणार तरी कसा?तासगाव शहरात एकीकडे भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून समझाेत्याचे राजकारण सुरू असल्याची चर्चा होत असते. त्यामुळे या निवडणुकीत काही कारभाऱ्यांचा सोयीस्करपणे बळी जाणार असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे काही मातब्बर संधी असूनही बाजूला राहण्याच्या मानसिकतेत आहेत. दुसरीकडे काँग्रेस आणि शिवसेनेसोबत राष्ट्रवादीकडून कसा प्रस्ताव दिला जाणार, याचेही औत्सुक्य आहे. सद्यस्थितीत आघाडीचा पेच सुटणार कसा, हा प्रश्न आहे.

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी