Sangli ZP Election 2026: मतदानासाठी प्रशासन सज्ज, झोनल अधिकाऱ्यांसह किती कर्मचाऱ्यांची नियुक्ती..वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 19:13 IST2026-02-04T19:11:39+5:302026-02-04T19:13:19+5:30

१८.१८ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क 

The administration is ready for the polling of the Sangli Zilla Parishad and Panchayat Samiti elections | Sangli ZP Election 2026: मतदानासाठी प्रशासन सज्ज, झोनल अधिकाऱ्यांसह किती कर्मचाऱ्यांची नियुक्ती..वाचा

Sangli ZP Election 2026: मतदानासाठी प्रशासन सज्ज, झोनल अधिकाऱ्यांसह किती कर्मचाऱ्यांची नियुक्ती..वाचा

सांगली : जिल्हा परिषद व १० पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी १८ लाख १८ हजार ७४२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यासाठी दोन हजार ३९ मतदान केंद्रे असून, या ठिकाणी २४८ झोनल अधिकारी आणि आठ हजार ९७९ कर्मचारी नियुक्त केले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली. जिल्हा प्रशासन मतदानासाठी सज्ज असून, ७ फेब्रुवारी रोजी मतदान, तर ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

जिल्हाधिकारी काकडे म्हणाले, जिल्ह्यात एकूण दोन हजार ३९ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, त्यासाठी २४८ झोनल अधिकारी व ८,९७९ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्या १८ लाख १८ हजार ७४२ इतकी असून, यामध्ये स्त्री, पुरुष व इतर मतदारांचा समावेश आहे.

कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने तसेच मतदान प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर प्रशासनाकडून काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सर्व मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांसह अधिकारी, कर्मचारी हजर होणार आहेत. मतदान शांततेत होण्यासाठी १० तालुक्यांमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.

जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या (तालुकानिहाय)
आटपाडी – १५२
जत – २९२
खानापूर – १३०
कडेगाव – १४८
तासगाव – २०१
कवठेमहांकाळ – १३०
पलूस – १२९
वाळवा – ३६०
शिराळा – १७१
मिरज – ३२६
एकूण : २,०३९

या ठिकाणी होणार मतमोजणी

आटपाडी – तहसील कार्यालय
जत – शासकीय धान्य गोदाम
खानापूर – बळवंत कॉलेज, विटा
कडेगाव – आयटीआय कडेगाव
तासगाव – मध्यवर्ती प्रशासकीय इमारत
कवठेमहांकाळ – प्रशासकीय इमारत
पलूस – दिवाणी न्यायालयाजवळ
वाळवा – शासकीय धान्य गोदाम, ईश्वरपूर
शिराळा – शासकीय आयटीआय
मिरज – नवीन शासकीय धान्य गोदाम

निवडणूक लोकशाहीचा उत्सव असून प्रत्येक मत अमूल्य आहे. नागरिकांनी निर्भयपणे मतदान करून लोकशाही बळकट करण्याची गरज आहे. मतदान केंद्रावर मूलभूत सुविधांसह चोक पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. - अशोक काकडे, जिल्हाधिकारी, सांगली.

Web Title : सांगली ZP चुनाव 2026: मतदान के लिए प्रशासन तैयार

Web Summary : सांगली जिला परिषद चुनाव के लिए प्रशासन तैयार है, जिसमें 18.18 लाख मतदाता हैं। 2,039 मतदान केंद्रों पर 248 ज़ोनल अधिकारी और 8,979 कर्मचारी तैनात किए गए हैं। मतदान 7 फरवरी को और मतगणना 9 फरवरी को होगी। शांतिपूर्ण चुनाव के लिए 10 तालुका में पुलिस सुरक्षा बढ़ाई गई है।

Web Title : Sangli ZP Election 2026: Administration Ready for Voting

Web Summary : Sangli prepares for ZP elections with 18.18 lakh voters. 2,039 polling centers will be staffed by 248 zonal officers and 8,979 employees. Voting is on February 7th, with counting on February 9th. Police security is heightened across 10 talukas for peaceful polls.