शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

तडवळेच्या आरोपीस दहा वर्षे सक्तमजुरी, मुलावर अत्याचार, पाच हजार रुपयांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 12:58 PM

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी तडवळे (ता. आटपाडी) येथील लक्ष्मण मच्छिंद्र गिड्डे (वय ३५) यास दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. अतिरिक्त जिल्हा व सत्रन्यायाधीश एस. एस. सापटणेकर यांनी सोमवारी हा निकाल दिला.

ठळक मुद्देअल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आलीचार हजार रुपये पीडित मुलास

सांगली : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी तडवळे (ता. आटपाडी) येथील लक्ष्मण मच्छिंद्र गिड्डे (वय ३५) यास दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. अतिरिक्त जिल्हा व सत्रन्यायाधीश एस. एस. सापटणेकर यांनी सोमवारी हा निकाल दिला.

पीडित मुलगा १ आॅगस्ट २०१६ रोजी दुपारी दोन वाजता जनावरांना वैरण आणण्यास शेतात गेला होता. त्यावेळी लक्ष्मण गिड्डे याने त्याला स्वत:च्या घरात बोलावून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला होता. घरी गेल्यानंतर मुलाने हा प्रकार त्याच्या वडिलांना सांगितला. त्यानंतर गिड्डेविरुद्ध आटपाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी गिड्डेविरुद्ध लैंगिक अत्याचारापासून बालकाचे संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या खटल्यात सरकारतर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडित मुलगा, फिर्यादी व वैद्यकीय अधिकाºयांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सहाय्यक जिल्हा सरकारी वकील आरती साटवीलकर-देशपांडे यांनी खटल्याचे काम पाहिले.चार हजार रुपये पीडित मुलास नुकसान भरपाईन्यायालयाने गिड्डेला शनिवारी दोषी ठरवून सोमवारी शिक्षा देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्याला दहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. यातील चार हजार रुपये पीडित मुलास नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.

टॅग्स :SangliसांगलीCourtन्यायालयCrimeगुन्हा