पंढरपूरात तिघांना दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

By admin | Published: July 28, 2016 04:14 PM2016-07-28T16:14:53+5:302016-07-28T16:14:53+5:30

निवडणुकीचा राग मनात धरुन एका गटाला मारहाण केल्याप्रकरणी रिपाईंचे नेते सुनिल दिगंबर सर्वगोड यांच्यासह तिघाना दहा वर्ष सक्त मजूरी आणखी एकाला दोन वर्ष कारावासाची शिक्षा पंढरपूरचे

Ten years of rigorous imprisonment for three years in Pandharpur | पंढरपूरात तिघांना दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पंढरपूरात तिघांना दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

Next

बजरंग नागणे

पंढरपूर -  निवडणुकीचा राग मनात धरुन एका गटाला मारहाण केल्याप्रकरणी रिपाईंचे नेते सुनिल दिगंबर सर्वगोड यांच्यासह तिघाना दहा वर्ष सक्त मजूरी आणखी एकाला दोन वर्ष कारावासाची शिक्षा पंढरपूरचे अतिरिक्त सत्र न्यायाधिश पी.आर. देशमुख यानी ठोठावली.

दहा वर्ष शिक्षा झालेल्यांची नावे अशी ; शाहू रमाकांत सर्वगोड, रवींद्र दिवाकर सर्वगोड तर जितेंद्र दिगंबर सर्वगोड यांना दोन वर्षाच्या कैदेची शिक्षा झाली.

या खटल्याची माहिती अशी की, पंढरपूर नगरपालिका निवडणूकीत प्रचारावरुन सुनिल व नितीन सर्वगोड यांच्यात भांडणे झाली होती. त्याचा राग मनात धरुन ८/६/२००७ रोजी नितीन व त्याचे मित्र क्रिकेट खेळायला जाताना घडली होती. सुनिल सर्वगोड आणि त्यांच्या साथिदारानी त्याना रस्त्यातच गाठून जबर मारहाण केली होती त्या प्रकरणी नितीन यानी पंढरपूर पोलिस ठाण्यात १५ जणांविरुध्द फिर्याद दिली होती. खटल्या दरम्यान त्यातील दोघांचा मृत्यू झाला तर उर्वरीत आरोपींपैकी चौघांना शिक्षा ठोठावत इतर ९ जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली
याच गुंह्यात आरोपी सुनिल सर्वगोड यांनीही नितीन सर्वगोड व त्याच्या १८ साथिदारांविरुध्द घरावर हल्ला केल्याची तक्रार दाखल दिली होती मात्र त्यातील सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

यात शिक्षा झालेल्या आरोपींतर्फे अँड मिलिंद थोबडे तर निर्दोष मुक्तता झालेल्यांतर्फे अँड भारत बहिरट, अँड बाबा जहागीरदार, अँड नितीन बाबर तर सरकारतर्फे अँड सारंग वांगीकर यांनी काम पाहिले

Web Title: Ten years of rigorous imprisonment for three years in Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.