दहा वर्षांनंतर भरला राजेवाडी तलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 13:49 IST2019-10-30T13:47:18+5:302019-10-30T13:49:01+5:30
राजेवाडी (ता. आटपाडी) येथील ऐतिहासिक तलाव तब्बल १० वर्षांनी शनिवारी भरला. सकाळी तलाव भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले. पाणी पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

दहा वर्षांनंतर भरला राजेवाडी तलाव
आटपाडी : राजेवाडी (ता. आटपाडी) येथील ऐतिहासिक तलाव तब्बल १० वर्षांनी शनिवारी भरला. सकाळी तलाव भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले. पाणी पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.
१८७२ मध्ये इंग्रजांनी राजेवाडी येथे तलाव बांधला. माणगंगा नदीवर बांधलेला हा तलाव अलीकडे मात्र पावसाअभावी वारंवार कोरडा पडतो. यापूर्वी २००९ मध्ये हा तलाव भरला होता. त्यानंतर मात्र पावसाअभावी तलावात पाणी आले नाही. २०१३ नंतर तर या तलावात पाणीच आले नहते.
गेली २ वर्र्षे राजेवाडीत प्रथमच पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर लागला. उरमोडी योजनेच्या पाण्याने यंदा प्रथमच १२ फूट पाणी पातळी होईपर्यंत विधानसभा निवडणुकीपूर्वी हा तलाव भरला होता. त्यानंतर म्हसवड परिसरात जोरदार पाऊस सातत्याने होत आहे.
त्या परिसरातील सर्व तलाव आधीच उरमोडी योजनेच्या पाण्याने भरले आहेत. त्यामुळे माणगंगा नदी भरून वाहिल्याने शनिवारी सकाळी तलाव पूर्ण क्षमतेने भरला. त्यामुळे राजेवाडीकरांसह तालुकावासीयांनी समाधान व्यक्त केले.