शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

बदलीसाठी सीईओंसमोर आकांडतांडव, सांगली जिल्हा परिषद इमारतीवरुन उडी टाकण्याची शिक्षिकेची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 15:00 IST

पोलिसांत गुन्हा, शिक्षिका कवठेमहांकाळची 

सांगली : कवठेमहांकाळमधील एका शिक्षिकेने चक्क जिल्हा परिषदेच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्येची धमकी दिली. त्याची गंभीर दखल घेत प्रशासनाने तिच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली. विश्रामबाग पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.सोमवारी दुपारी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात हा गोंधळ झाला. त्यानंतर, रात्री उशिरा प्रशासनाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संबंधित शिक्षिका कवठेमहांकाळमध्ये सहकुटुंब राहण्यास आहे. जत तालुक्यातील एका शाळेत नियुक्त आहे. तिच्या वर्तनाविषयी पालकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या. याची दखल घेत, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशी केली असता, पालकांच्या तक्रारीत तथ्य आढळले. त्यामुळे सुमारे दीड महिन्यांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी तिच्यावर निलंबनाची कारवाई केली. निलंबन काळात शिराळा तालुक्यात नियुक्ती दिली.

पण दूरच्या तालुक्यात नियुक्ती दिल्याने शिक्षिका संतापली. कवठेमहांकाळ तालुक्यातच बदलीची मागणी केली. त्यासाठी महिन्याभरापासून जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांकडे पिच्छा पुरविला. मात्र, कारवाईवर प्रशासन ठाम राहिले. त्यामुळे तिने सोमवारी रुद्रावतार धारण करीत मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या दालनात दंगा केला. ‘कवठेमहांकाळमध्ये बदली केली नाही, तर जिल्हा परिषदेच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या करू,’ असा इशारा दिला. धोडमिसे यांनी याची गंभीर दखल घेतली. तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. 

शिक्षिकेची बदली शिराळा तालुक्यात केली असली, तरी प्रशासकीयदृष्ट्या तशी कार्यवाही केली होती. तीन महिन्यांनी निलंबन मागे घेऊन पुन्हा पूर्ववत नियुक्ती दिली जाणार होती, पण शिक्षिकेने प्रशासनाच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करीत जिल्हा परिषदेत बेशिस्त वर्तन केले. - तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी, सांगली जिल्हा परिषद

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषदTeacherशिक्षकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस