शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक बँकेने व्याजदर कमी न केल्यास राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:23 IST

शिक्षक समिती बँकेत सत्तेत आल्यानंतर संचालक मंडळाने स्टॅम्प ड्युटी कमी करणे, कायम ठेवी परत देणे, आरटीजीएस, एनईएफटी सुविधा, ...

शिक्षक समिती बँकेत सत्तेत आल्यानंतर संचालक मंडळाने स्टॅम्प ड्युटी कमी करणे, कायम ठेवी परत देणे, आरटीजीएस, एनईएफटी सुविधा, कर्जदार मृत सभासदांना २० लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी तर निष्कर्जी सभासदांच्या कुटुंबास ३ लाख रुपयांची आर्थिक मदत असे अनेक सभासद हिताचे निर्णय घेतले आहेत. कर्जाचा व्याजदर दोन वेळा अर्धा टक्‍क्‍यांनी कमी करून डिव्हिडंडही दरवर्षी वाढवत ६ टक्क्यांपर्यंत दिला आहे.

मात्र, वारंवार कर्जाचा व्याजदर अजूनही कमी करावा यासाठी बऱ्याचदा विनंती करूनही एका विशेष व्यक्तीकडून याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात असल्याचा आरोप खटावकर यांनी केला.

सर्व सभासद बंधू-भगिनींनी बँकेच्या समान हप्त्याच्या कर्जाचा व्याजदर १ अंकी करावा अशी इच्छा व्यक्त केली. कर्जाचा व्याजदर कमी करण्याचा निर्णय आठ दिवसांत न झाल्यास संचालक पदाचा राजीनामा देण्याचा इशारा खटावकर यांनी दिला आहे.

चौकट

अपमानास्पद वागणूक

समितीच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत बऱ्याचवेळा कर्जाचा व्याजदर कमी व्हावा यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु कर्जाचा व्याजदर कमी करण्यात आम्ही अपयशी ठरलो. कर्जाचा व्याजदर कमी करावा असे मत वारंवार मांडल्यामुळे एका विशेष व्यक्तीकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप करीत शिक्षक समितीचे सदस्य भागवत ऊर्फ युवराज कोळेकर यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.