शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: तासगाव-कवठेमहांकाळला भाजप अस्तित्वाच्या शोधात; संजयकाकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने समीकरणे बदलली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 17:02 IST

पदाधिकारी ‘जैसे थे’; सदस्य नोंदणीकडे पाठ

दत्ता पाटीलतासगाव : तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात गेल्या दहा वर्षांपासून दबदबा असलेला भाजप मतदारसंघात अस्तित्वाच्या शोधात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. विधानसभा निवडणुकीला माजी खासदार संजय पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. संजयकाका समर्थक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या सदस्य नोंदणीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे पक्षीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे भाजपची धुरा पुन्हा जुन्या निष्ठावंत शिलेदारांवर आली आहे.माजी खासदार संजयकाका पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात भाजप केवळ नावापुरता अस्तित्वाला होता. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत संजयकाकांनी भाजपमध्ये प्रवेश करून लोकसभेत प्रवेश केला. तेव्हापासून तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात भाजपचे वर्चस्व दिसून येत होते. जिल्हा परिषद, पंचायत समिती, तासगाव नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांत भाजपचे कारभारी सत्तेत आले होते.दहा वर्षांनंतर संजय पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी महायुतीच्या फॉर्म्युला फारसा फरक पडला नाही. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने सदस्य नोंदणीचे अभियान सुरू केले आहे. या अभियानात भाजपचे संजयकाका समर्थक पदाधिकारी दिसत नाहीत. संजयकाकांनी पक्ष सोडला तरी भाजपच्या कार्यकारिणीवर काका समर्थक कार्यकर्ते काम करत आहेत. मात्र, या सर्व कार्यकर्त्यांनी भाजपच्या अभियानाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील भाजपची धुरा पक्षाच्या परंपरागत जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर आली आहे.

पदाधिकारी ‘जैसे थे’; सदस्य नोंदणीकडे पाठभाजपकडून देशभरात पाच तारखेला सदस्य नोंदणीला सुरुवात करण्यात आली. मात्र, या नोंदणीकडे तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. माजी खासदार संजय पाटील यांनी पक्ष सोडला. तरी त्यांचे समर्थक असणारे पदाधिकारी ‘जैसे थे’ आहेत. मात्र, या पक्ष नोंदणीकडे पदाधिकाऱ्यांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माजी पदाधिकाऱ्यांनी ही पाठ फिरवली आहे.

‘भाजप’ची धुरा या शिलेदारांवर संदीप गिड्डे, स्वप्नील पाटील, महेश पाटील, दिलीप जोगळेकर, प्रसन्न गोसावी, विनय संकपाळ, प्रशांत कुलकर्णी, गोविंद सूर्यवंशी, सुभाष माळी, संतोष पोळ, इंद्रनील पाटील, सुंदर पाटील.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणtasgaon-kavathe-mahankal-acतासगाव-कवठेमहांकाळBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार