शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: इस्लामपूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादीतील राजकीय खेळ्यांना धक्का, एकत्रिकरणाच्या चर्चेने संभ्रमावस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 18:06 IST

विरोधातील नेत्यांची भूमिका काय असणार?

अशोक पाटीलइस्लामपूर : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना त्यांच्याच मतदारसंघात शह देण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून राजकीय खेळ्या सुरु होत्या. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाच्या चर्चेने येथील स्थानिक खेळ्यांना धक्का बसला असून टोकाचा संघर्ष करणाऱ्या दोन्ही राष्ट्रवादीतील नेते, कार्यकर्त्यांत या चर्चेने संभ्रम व अस्वस्थता दिसून येत आहे.खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी पुन्हा एकसंघ होण्यासाठी नवीन डाव टाकला आहे. याचे अधिकार खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जयंत पाटील यांच्याकडे दिले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, अशा चर्चेने जोर धरला असतानाच जयंत पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्तास्थानी ते जातील अन् मतदारसंघ व जिल्ह्यातील दोर पुन्हा त्यांच्या हाती येतील का, अशीही शंका उपस्थित केली जात आहे.एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीचे मिलन होणार नाही, असा तर्क काहीजण लावत आहेत, तर दोन राष्ट्रवादीमधील वाद संपल्यानंतरच आमदार जयंत पाटील यांना मंत्रीपद मिळू शकते, अशीही चर्चा त्यांच्या समर्थकांत दिसून येत आहे. मात्र, जयंत पाटील यांच्या ताकदीला आव्हान देत राजकीय खेळ्या करणाऱ्या विरोधकांच्या प्रयत्नाला अचानक या चर्चेने ब्रेक मिळाला आहे.

विरोधातील नेत्यांची भूमिका काय असणार?आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात अजित पवार गटातून विधानसभा निवडणूक लढविलेले निशिकांत पाटील, वाळवा तालुका राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष केदार पाटील यांच्यासह नुकतेच अजित पवार गटात आलेले माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची भूमिका काय असेल, याबाबतही तर्कवितर्क सुरु आहेत.

जिल्ह्याच्या राजकारणात आमदार जयंत पाटील जो निर्णय घेतील, तो आम्ही मानू. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, याची चर्चा मात्र राजकीय वर्तुळातून आहे. याबाबत आपणास काहीही माहीत नाही. - देवराज पाटील, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणislampur-acइस्लामपूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारJayant Patilजयंत पाटील