प्रताप महाडिककडेगाव : तडसरच्या मातीतून उगवलेला एक तेजस्वी इतिहासदीप आज कायमचा मावळला… आणि त्या प्रकाशाच्या विरहाने संपूर्ण गाव अश्रूंनी दाटून आले. प्रज्ञावंत इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांच्या निधनाने तडसर गावावर शोककळा पसरली असून, ही केवळ एका व्यक्तीची हानी नसून एका विचारप्रवाहाचा, एका युगाचा अंत असल्याची भावना ग्रामस्थांच्या मनात दाटून आली आहे.जयसिंगराव पवार हे नाव म्हणजे केवळ इतिहास अभ्यासक नव्हे, तर इतिहास जगणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होती. तडसर ही त्यांची जन्मभूमीच नव्हे, तर त्यांच्या विचारांची पाळणाघर होती. इथल्या शाळेच्या ओसरीवरून सुरू झालेला त्यांचा प्रवास महाराष्ट्राच्या इतिहासाच्या गाभ्यापर्यंत पोहोचला; पण त्या प्रवासात त्यांनी कधीही आपल्या मातीतली नाळ तुटू दिली नाही. २३ सप्टेंबर २०१९ चा दिवस आजही गावकऱ्यांच्या स्मरणात जिवंत आहे. रयत शिक्षण संस्था संचलित तात्यारावजी विद्यालयाच्या विद्यार्थी वसतिगृहाच्या उद्घाटनासाठी ते गावात आले होते. त्या भेटीत त्यांच्या डोळ्यांत दाटलेले बालपण, ग्रामस्थांशी साधलेले आत्मीय संवाद, आणि मातीतल्या माणसांबद्दलचा जिव्हाळा आजही प्रत्येकाच्या मनात घर करून आहे. तोच इतिहासपुरुष आज कायमचा निघून गेल्याची जाणीव गावाला अस्वस्थ करून जाते. तडसरच्या वैभवात मोलाची भर घालणाऱ्या व्यक्तींमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. अरविंद इनामदार यांच्यासारख्या मान्यवरांसोबत जयसिंगराव पवार यांनीही गावाचे नाव अभिमानाने उंचावले. त्यांच्या संशोधनातून महाराष्ट्राच्या इतिहासातील अनेक अज्ञात पैलू उजेडात आले. परंतु या सर्व यशामागे उभी होती ती तडसरच्या संस्कारांची समृद्ध परंपरा ही जाणीव गावकऱ्यांना नेहमीच अभिमानाने भरून टाकते.पवारांचा इतिहास दृष्टिकोन जपणे हीच त्यांना आदरांजलीतडसरमध्ये शोकसभा, श्रद्धांजलीचे कार्यक्रम होतील; पण खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली देण्याचा मार्ग एकच तो म्हणजे त्यांनी दाखवलेला इतिहास दृष्टिकोन जपणे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत नव्या पिढीने संशोधनाची मशाल पुढे नेली, तरच हा इतिहासपुरुष खऱ्या अर्थाने जिवंत राहील. तडसरची माती आज अश्रूंनी ओलावलेली आहे. पण, त्याचवेळी त्या मातीतून उगवलेल्या इतिहासदीपाच्या प्रकाशाने ती सदैव उजळलेलीही राहणार आहे.
Web Summary : Historian Jaisingrao Pawar, a native of Tadsar, passed away, plunging the village into mourning. His historical insights and connection to his roots deeply impacted the community, leaving a legacy of historical awareness and inspiration for future generations. He was known for his significant contributions to Maharashtra's history.
Web Summary : इतिहासकार जयसिंगराव पवार, जो तडसर के मूल निवासी थे, का निधन हो गया, जिससे गाँव में शोक की लहर दौड़ गई। उनके ऐतिहासिक अंतर्दृष्टि और अपनी जड़ों से जुड़ाव ने समुदाय को गहराई से प्रभावित किया। महाराष्ट्र के इतिहास में उनके महत्वपूर्ण योगदान के लिए उन्हें जाना जाता था।