शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

स्वाभिमानी कार्यकर्ते, पोलिसांत जोरदार झटापट : कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 5:39 PM

Swabimani Shetkari Sanghatna SugerFactory Sangli-एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दत्त इंडिया कंपनीच्या वसंतदादा कारखान्याच्या गव्हाणीत उड्या मारण्यासाठी मोर्चा काढला होता. मोठा पोलीस फौजफाटा तैनात केल्यामुळे कारखान्याबाहेरच कार्यकर्त्यांना बॅरिकेटस् लावून रोखले.

ठळक मुद्देगव्हाणीत उड्या मारण्यासाठी बॅरिकेटस्‌ ओलांडण्याचा प्रयत्नदत्त इंडियाकडून एकरकमी एफआरपीचे आश्वासन

सांगली : एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दत्त इंडिया कंपनीच्या वसंतदादा कारखान्याच्या गव्हाणीत उड्या मारण्यासाठी मोर्चा काढला होता. मोठा पोलीस फौजफाटा तैनात केल्यामुळे कारखान्याबाहेरच कार्यकर्त्यांना बॅरिकेटस् लावून रोखले.

आक्रमक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बॅरिकेटस् ओलांडून कारखान्यात घुसण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. अखेर दत्त इंडियाच्या प्रशासनाने एकरकमी एफआरपी देण्याचे मान्य केल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.जिल्ह्यातील कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये एफआरपीबाबत कडेगाव येथे बैठक झाली होती. या बैठकीत एकरकमी एफआरपी देण्याचे सर्वच साखर कारखानदारांनी मान्य केले होते. गळीत हंगाम सुरू होऊन दोन महिने झाल्यानंतर सोनहिरा, उदगिरी शुगर आणि दालमिया या कारखान्यांनी शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी दिली आहे. उर्वरित एकाही कारखान्याने एकरकमी एफआरपी न देता दोन, तीन हप्त्यांमध्ये बिल देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.वसंतदादा कारखाना चालवित असलेल्या दत्त इंडिया कारखान्यानेही पहिला हप्ता दोन हजार ५०० रुपये दिला असून, उर्वरित ३९२ रुपयांचा दुसरा हप्ता प्रलंबित आहे. याप्रकरणी दत्त इंडिया कंपनी प्रशासनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे यांनी गव्हाणीत उड्या मारणार असल्याचे निवेदन दिले होते.

तरीही कारखाना प्रशासनाने कोणतीच कार्यवाही केली नव्हती. म्हणून अखेर शुक्रवारी महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गनिमीकाव्याने दत्त इंडिया कारखान्याच्या गव्हाणीत उड्या मारण्यासाठी प्रयत्न केला; पण कारखान्याच्या सर्व बाजूला कडक पोलीस बंदोबस्त तैनात होता.

बॅरिकेटस्‌ लावून रस्ता अडवला होता. दुपारी बाराच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना कारखान्याच्या मुख्य गेटवरच पोलिसांनी अडवले. कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. त्यामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता.

दत्त इंडिया कंपनीचे उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे, व्यवस्थापक शरद मोरे यांनी आंदोलनस्थळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी उर्वरित बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा दिवसांत वर्ग केली जातील. तसेच यापुढील ऊस गाळपास येणाऱ्या शेतकऱ्यांना एकरकमीच एफआरपी दिली जाईल, असे आश्वासन दिले.

आंदोलनात संदीप राजोबा, पोपट मोरे, संजय बेले, भागवत जाधव, भरत चौगुले, श्रीधर उदगावे, राजेंद्र माने, बाळासाहेब जाधव, महेश जगताप, राजू परीट, प्रताप पाटील, संतोष शेळके, काशिनाथ निंबाळकर, मारुती देवकर, दीपक मगदूम आदींसह शेतकरी सहभागी होते.

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाSugar factoryसाखर कारखानेSangliसांगली