शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशास समर्थकांचा हिरवा कंदील, निकटवर्तीयांशी केली चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 18:16 IST

वरिष्ठ पातळीवर हालचाली गतिमान

अशोक पाटीलइस्लामपूर : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या वृत्ताची चर्चा रंगली असताना त्यांच्या काही समर्थकांनाही हा प्रवेश व्हावा, असे वाटत असल्याचे दिसून येते. जयंत पाटील यांनी काही विश्वासू निकटवर्तीयांशी याबाबत चर्चा केल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष आता जयंत पाटील यांच्या भूमिकेकडे लागून राहिले आहे.चर्चांच्या वादळात जयंत पाटील यांनी काहीच स्पष्ट केलेले नाही. भाजपमधून एक मंत्रिपद सांगलीसाठीच राखून ठेवल्याचे भाजपच्या नेत्यांनी वेळोवेळी स्पष्टही केले. येथील पालकमंत्रिपद जयंत पाटील यांच्याकडेच येईल, असा तर्कही राजकीय वर्तुळात लावला जात आहे. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सांगलीचे पालकमंत्रिपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवल्याने जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशावर काहींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

इस्लामपूर मतदारसंघातील भाजपच्या काही नेत्यांनी जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका राज्यमंत्र्याने जयंत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत, अशी प्रतिक्रिया दिली. तरीही भाजप प्रवेशासंदर्भात जयंत पाटील यांनी निकटवर्तीयांशी चर्चा केली असल्याचे वृत्त आहे.

कासेगाव (ता. वाळवा) येथील क्रांतिवीर बाबुजी पाटणकर यांचा ७३ वा स्मृतिदिन साजरा होत आहे. यावेळी पक्षाचे नेते शरदचंद्र पवार, खासदार विशाल पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, डॉ. भारत पाटणकर, डॉ. कॉ. संपत देसाई यांची नावे निमंत्रण पत्रिकेत आहेत. परंतु जयंत पाटील यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत नसल्याने कासेगाव पंचक्रोशीत यावरूनही तर्कवितर्क लढवले जात आहेत. गतवर्षीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील उपस्थित होते. याची आठवणही सर्वसामान्य नागरिक करून देत आहेत. त्यामुळेच सध्यातरी जयंतराव द्विधा मनस्थितीत असले तरी त्यांचेच समर्थक त्यांच्या भाजप प्रवेशाची इच्छा बाळगून असल्याचे दिसत आहे.

हा करेक्ट कार्यक्रम तर नव्हे?‘जयंत पाटील भाजपच्या वाटेवर’ अशा मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या ‘लोकमत’च्या वृत्तावर जयंतरावांच्या समर्थकांसह विरोधकांनी समाजमाध्यमावर चर्चा सुरू केली आहे. काही हितचिंतकांनी पाठिंबा दर्शविला, तर काहींनी भाजपने त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारBJPभाजपा