शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

शिधापत्रिकेवरील धान्य पुरवठा करा, अन्यथा आंदोलन

By admin | Updated: February 4, 2015 00:02 IST

राष्ट्रवादीचा इशारा : इस्लामपुरात तहसीलदारांना निवेदन

इस्लामपूर : भाजप-शिवसेना युतीच्या केंद्र व राज्य शासनाने पूर्वीप्रमाणे अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत स्वस्त धान्य पुरवठा सुरू करून रॉकेलचा कोटा पूर्ववत करावा़, अन्यथा गोर-गरिबांच्या तोंडातील घास काढून घेणाऱ्या शासनाविरोधात तीव्र आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने मंगळवारी देण्यात आला़ संजय गांधी योजनेच्या नायब तहसीलदार सौ. आर. पी. बिचकर यांच्याकडे पक्षाच्यावतीने निवेदन देण्यात आले़ तालुकाध्यक्ष बी़ के. पाटील म्हणाले, पूर्वीचे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकार गोरगरीब कुटुंबांना अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत धान्य पुरवठा करीत होते़ हे धान्य वाटणे आता बंद केले आहे़ हे शासन लोकांविरोधी काम करीत असून, ते आम्ही खपवून घेणार नाही.युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संजय पाटील म्हणाले, युती शासनाने रॉकेल कोट्यात ७२ टक्क्यापर्यंत कपात केली आहे़ ती त्यांनी पूर्ववत करावी अन्यथा गोर-गरिबांच्या रोषाला सामोरे जावे लागेल़ जिल्हा परिषद उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, पंचायत समिती सभापती रवींद्र बर्डे, नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी,जिल्हा उपाध्यक्ष विष्णूपंत शिंदे, महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षा सौ़ सुस्मिता जाधव यांनी शासनास तीव्र आंदोलनास सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला़ माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील, बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील, दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, युवक शहराध्यक्ष खंडेराव जाधव, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड़ चिमण डांगे, बाजार समितीचे सभापती आनंदराव पाटील, उपसभापती सुरेश गावडे, सौ़ सुनीता देशमाने, सौ़ रोझा किणीकर, रफिक तांबोळी, शैलेंद्र सूर्यवंशी, विशाल सूर्यवंशी, विराज शिंदे, डॉ़ अशोक पाटील, एस़ आऱ पाटील उपस्थित होते. शहाजीबापू पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)