शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

"राज्यातील साखर कामगार बेमुदत संपावर जाणार", सांगलीत राज्यातील कामगारांचा मेळावा

By अशोक डोंबाळे | Updated: October 14, 2024 17:17 IST

सत्तापरिवर्तनात कामगारांची भूमिका निर्णायक

सांगली : महाराष्ट्रातील साखर उद्योगातील कामगारांची वेतनवाढ व सेवा-शर्तींबाबतच्या राज्य पातळीवर झालेल्या त्रिपक्षीय समितीच्या कराराची मुदत ३१ मार्च २०२४ रोजी संपली आहे. साखर कारखान्यांतील कामगारांच्या वेतनवाढीकडे राज्य सरकार पूर्ण दुर्लक्ष करत आहे. म्हणूनच दि.१६ डिसेंबरपासून राज्यातील सर्व साखर कामगार बेमुदत संपावर जात आहेत, अशी घोषणा महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे व उपाध्यक्ष प्रदीप शिंदे यांनी केली.राज्यातील साखर कामगारांचा मेळावा सोमवारी सांगलीत झाला. यावेळी काळे व शिंदे बोलत होते. यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष अविनाश आपटे, राऊ पाटील, सरचिटणीस शंकरराव भोसले, काेषाध्यक्ष प्रदीप बनगे, उपाध्यक्ष युवराज रणवरे, नितीन बेनकर, अशोक बिराजदार, सचिव सयाजी कदम, राजेंद्र तावरे, संजय मोरबाळे, संजय पाटील, साखर कामगार महासंघाचे चिटणीस आनंदराव वायकर आदी उपस्थित होते.

काळे व शिंदे म्हणाले, साखर उद्योगातील कामगारांचे वेतन व सेवा-शर्ती ठरविण्याबाबत शासनाने त्रिपक्षीय समिती गठित करावी व वेतनवाढीचा निर्णय घ्यावा, साखर कामगारांचे थकीत वेतन मिळालेच पाहिजे. कारखान्यातील रोजंदारी, कंत्राटी, नैमित्तिक व तात्पुरत्या काम करणाऱ्या कामगारांनाही अकुशल कामगारांच्या वेतनाप्रमाणे मागील करारातील तरतुदीनुसार वेतन मिळाले पाहिजे. भाडेपट्ट्यावर, सहभागीदारी तत्त्वाने व विक्री केलेल्या तसेच खासगी साखर कारखान्यांतील कामगारांना त्रिपक्षीय समितीच्या कराराप्रमाणे वेतन मिळाले पाहिजे.तसेच त्यांच्या थकित वेतनाची रक्कम व्यवस्थापनाकडून अग्रक्रमाने मिळाली पाहिजे. स्थानिक संघटनेची मान्यता घेऊनच करार करावा, बंद साखर कारखाने सुरू करण्यासाठी शासनाने अनुदान द्यावे किंवा भाडेपट्ट्याने चालविण्यास द्यावे. यासह २५ मागण्यांसाठी मोर्चे आणि अनेक आंदोलने केली आहेत. पण, राज्य सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. म्हणूनच १६ डिसेंबरपासून राज्यातील सर्व कामगार बेमुदत संपावर जाणार आहेत. या संपाला राज्य सरकार जबाबदार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

सत्तापरिवर्तनात कामगारांची भूमिका निर्णायकराज्याच्या सत्तापरिवर्तनामध्ये साखर कामगारांची भूमिका निर्णायक असून, त्या कामगारांकडे दुर्लक्ष करणे सरकारला महागात पडेल. राज्यातील सर्व कामगार सरकारच्या विरोधात जाऊन काम करतील, असा इशाराही प्रदीप शिंदे यांनी दिला.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेStrikeसंप