शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

‘सखीं’ना केकसह सुग्रास भोजनाच्या टिप्स

By admin | Updated: December 29, 2014 23:52 IST

इस्लामपुरात प्रशिक्षण : खास आकर्षण बनली ‘डॉल केक’

इस्लामपूर : ‘लोकमत’ सखी मंच सदस्यांसह इतर महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या पाककला प्रशिक्षणात सहभागी महिलांनी केक, कुकीज, कुल्चा, नान यासह अनेक ग्रेव्हींच्या रेसीपीज शिकत आणि त्या आत्मसात करत सरत्या वर्षाला निरोप दिला. जवळपास पाच तासाहून अधिक काळ चाललेल्या या प्रशिक्षणात सुगरण सखींना सुग्रास टिप्स मिळाल्या.येथील राजारामबापू पाटील नाट्यगृहात ‘लोकमत’ सखी मंचतर्फे नववर्षाच्या पूर्वसंध्येला ‘केक वर्कशॉप’चे आयोजन करण्यात आले होते. प्रथमेश इलेक्ट्रॉनिक्सच्या सहकार्याने हा उपक्रम झाला. ‘लोकमत’चे संस्थापक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, श्रध्देय जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांनी केले. यावेळी ‘प्रथमेश’चे रवी सूर्यवंशी, रमेश सूर्यवंशी, सौ. संगीता सूर्यवंशी, सौ. सविता सूर्यवंशी, सौ. स्वाती पवार (पुणे), अभिषेक तेवरे उपस्थित होते. कोल्हापूरच्या तेजस पाटील, प्रसाद जाधव यांनी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. नगराध्यक्ष सूर्यवंशी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.त्यानंतर सखींच्या आवडत्या प्रशिक्षणाला सुरुवात झाल्यावर नाट्यगृहात मायक्रो ओव्हनमधील खमंग पदार्थांच्या दरवळणाऱ्या सुवासाची झुळूक मने उल्हसित करणारी ठरली. ब्लॅक फॉरेस्ट केक, पायनापल, डॉल केक, चॉकलेट केक, व्हॅनिला, हार्ट शेफ अशा विविध प्रकारच्या केकसह त्यावरील आईसिंगची सजावट, नानकटाई, कुकीज, कुल्चा, नान, पाव याची प्रात्यक्षिके झाली. त्यानंतर मायक्रो ओव्हनमधील ढोकळा, इडली, पिझ्झा, पनीर पहाडी, कबाब, ओनीअन ग्रेव्ही, पनीर टिक्का मसाला याच्या रेसीपी दाखविण्यात आल्या. मायक्रोव्हेव वापरासंबंधी माहिती देऊन त्यांच्या शंकांचे समाधान केले.सरत्या वर्षातील (२0१४) हा शेवटचा कार्यक्रम होता. प्रथमेशच्यावतीने सखी सदस्यांसाठी खास सवलत देण्याचे रवी सूर्यवंशी यांनी जाहीर केले. सखी मंच संयोजिकांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. संयोजन समितीच्या सौ. सायली लोणिष्टे, सुनंदा सोनटक्के, कौसल्या सूर्यवंशी, राजवी शहा उपस्थित होत्या. (वार्ताहर)