शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

कडकनाथ घोटाळ्याचा म्होरक्या सुधीर मोहितेची कार हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 00:37 IST

इस्लामपूर : कडकनाथ कोंबडीपालन व्यवसायातून महाराष्ट्रासह परराज्यातील शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाºया रयत अ‍ॅग्रो इंडिया कंपनीचा सर्वेसर्वा सुधीर मोहिते ...

इस्लामपूर : कडकनाथ कोंबडीपालन व्यवसायातून महाराष्ट्रासह परराज्यातील शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाºया रयत अ‍ॅग्रो इंडिया कंपनीचा सर्वेसर्वा सुधीर मोहिते याची १ कोटी रुपये किमतीची महागडी आलिशान कार पाटण पोलिसांनी जप्त केली. इस्लामपूर पोलिसांनी यापूर्वीच संदीप मोहिते याच्याकडील आलिशान कार जप्त केली आहे.पोलिसांच्या या कारवाईमुळे सुधीर मोहितेच्या आलिशान जगण्याची चर्चा परिसरात सुरु आहे. या कोट्यवधीच्या घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जात आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह सातारा जिल्ह्यातही शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत.पाटण येथे दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी सुधीर मोहिते याची आलिशान कार जप्त करुन त्याला दणका दिला आहे. या कडकनाथ घोटाळ्यात राज्यातील शेतकºयांसह कर्नाटक, केरळ, तेलंगणा, छत्तीसगड या राज्यांतील शेतकºयांनाही गंडा घालण्यात आला आहे. या कडकनाथ घोटाळ्यात ८ हजाराहून अधिक शेतकºयांची ५00 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे.कडकनाथप्रकरणी संचालक रडारवर!सांगली : फलटण (जि. सातारा) येथील फूूड बर्ड अ‍ॅग्रो प्रायव्हेट कंपनीने कडकनाथ कोंबडी पालनातून जिल्ह्यातील १४० गुंतवणूकदारांना एक कोटी ५४ लाख ६६ हजारांच्या फसवणूक प्रकरणात तीन संशयितांना अटक केली असतानाच यातील अन्य संचालकही आता कारवाईच्या रडारवर आहेत. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे असून, फसवणूक झालेल्या १४० शेतकºयांचेही जबाब नोंदवून घेण्यात येत आहेत.गुंतवणूकदारांकडून तक्रारी नाहीतफूड बर्ड कंपनीकडून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची संख्या सध्या १४० सांगण्यात येत असली तरी त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी पुढे यावे. फसवणुकीबाबत तक्रार दाखल करावी, असे आवाहन केले आहे मात्र, आवाहनानंतरही अद्याप तक्रारी दाखल झालेल्या नाहीत.कडकनाथ कोंबडीपालन घोटाळ्यातील प्रमुख संशयित सुधीर मोहिते याची आलिशान मोटार पाटण (जि. सातारा) येथे जप्त करण्यात आली.