शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पहिलीतील विद्यार्थिनीची शिक्षकाकडून लैंगिक छेडछाड, शिक्षक अटकेत; सांगलीतील घटना

By संतोष भिसे | Updated: March 19, 2024 17:45 IST

पालकांच्या उद्रेकानंतर बडतर्फीची कारवाई

सांगली : शहरातील एका खासगी इंग्रजी शाळेत पहिलीतील विद्यार्थिनीशी शिक्षकाने लैंगिक छेडछाड करण्याचा प्रकार घडला. विश्रामबाग पोलिसांनी संदीप पवार (रा. सांगली) या शिक्षकाला अटक केली असून त्याच्याविरोधात विनयभंग व लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.सोमवारी सकाळी अकरा ते साडेअकरा या वेळेत शिक्षकाने वर्गातच या मुलीशी गैरवर्तन केल्याची तक्रार आहे. याची माहिती मुलीने घरात सांगितल्यानंतर मोठ्या संख्येने पालक शाळेत एकत्र आले. प्राचार्यांकडे तक्रार केली. त्यानंतर पालक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनाही भेटले. प्राचार्य व पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांविरोधात पोलिसांत तक्रार देण्याची तयारी केली. यादरम्यान, मंगळवारी पालक स्वत:च विश्रामबाग पोलिस ठाण्यात गेले. तेथे मुलीच्या आईने तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदविला.संदीप पवार हा २०१९ पासून या शाळेत शिक्षक म्हणून काम करतो. त्याच्याविरोधात अशा प्रकारच्या तक्रारी यापूर्वी कधीच नव्हत्या असे प्राचार्यांनी सांगितले. मात्र त्याने आजवर अनेक मुलींशी गैरवर्तन केल्याचा दावा पालकांनी केला. या घटनेमुळे मंगळवारी दुपारपर्यंत शाळेत पालकांनी एकच गर्दी केली होती. पोलिसांनी पवार याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. निरिक्षक ईश्वर ओमासे यांनी सांगितले की, पवारविरोधात मुलीच्या आईने तक्रार दिली असून त्याला ताब्यात घेतले आहे. त्याला संस्थेने सेवेतून सोमवारीच बडतर्फ केल्याची माहिती प्राचार्यांनी दिली. संस्थेनेही त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली.दरम्यान, शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रतिष्ठित शाळेत असा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली. शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही असा प्रकार कसा घडला? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीStudentविद्यार्थीTeacherशिक्षकPoliceपोलिस