शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: विद्यार्थ्याने गळफास घेत जीवन संपवले; संतप्त नातेवाइकांनी केली शिक्षकाच्या घराची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 13:26 IST

शिक्षकाने अपमान केल्याची गावात चर्चा

वाळवा : अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या विराज शिवाजी डकरे (वय १७) या विद्यार्थ्याने शुक्रवारी राहत्या घरी आत्महत्या केली. त्याने छताच्या लोखंडी हुकाला साडीने गळफास घेतला. सकाळच्या सुमारास बडोदा बँकेशेजारी ही घटना घडली.याबाबत डॉ. प्रवीण धेंडे यांनी वर्दी दिली. दरम्यान, विराजच्या आत्महत्येला जबाबदार असल्याच्या संशयावरून त्याच्या नातेवाइकांनी वाळवा - इस्लामपूर रस्त्यावरील एका शिक्षकाच्या घरावर हल्ला केला. खिडक्या फोडल्या. अंगणात उभी केलेली दुचाकी जमावाने फोडली. घटनेचे गांभीर्य ओळखून आष्टा पोलिसांनीशिक्षकाच्या घरासमोर बंदोबस्त तैनात केला. हल्ल्याबाबत पोलिसांत रात्री उशिरापर्यंत नोंद नव्हती.अतिशय हुशार असणाऱ्या विराजने दहावीत ८९ टक्के गुण मिळविले होते. तो वाळव्यातील शाळेत तांत्रिक विभागात शिकत होता. आज सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत गेला. सकाळच्या सत्रात शाळा असल्याने अकरा वाजता घरी आला. त्यानंतर काही वेळातच घरात दुसऱ्या मजल्यावरील खोलीत छताच्या लोखंडी हुकाला साडीने गळफास घेतला. ही घटना लक्षात येताच नातेवाइकांनी आरडाओरडा केला. त्याला अत्यवस्थ अवस्थेत इस्लामपूरला उपचारासाठी नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

पोलिस बंदोबस्तविराजने आत्महत्या केल्याचे समजताच शाळेतील सहकारी विद्यार्थ्यांना धक्का बसला. वर्गात एका शिक्षकाने विराजचा अपमान केल्याची चर्चा गावात पसरली. त्यानंतर संतप्त नातेवाइकांनी शिक्षकाच्या घरावर हल्ला केला. बराच वेळ तोडफोड केली. सायंकाळी विराजचा मृतदेह घरी आणण्यात आला. यावेळी मोठी गर्दी झाली होती. विराजच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :SangliसांगलीStudentविद्यार्थीTeacherशिक्षकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस