Sangli: झेडपी निवडणुकीमुळे चिंचली यात्रेतील एसटीचे उत्पन्न घटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 16:44 IST2026-02-19T16:44:15+5:302026-02-19T16:44:28+5:30

गतवर्षीच्या तुलनेत सांगली विभागाला ६ लाख ९३ हजारांची तूट; भाविकांनी एसटीकडे फिरवली पाठ

ST's income from Chinchli Yatra decreased due to ZP elections | Sangli: झेडपी निवडणुकीमुळे चिंचली यात्रेतील एसटीचे उत्पन्न घटले

Sangli: झेडपी निवडणुकीमुळे चिंचली यात्रेतील एसटीचे उत्पन्न घटले

प्रसाद माळी

सांगली : विविध यात्रा आणि सण, उत्सवांदरम्यान जादा वाहतुकीमुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा सांगली विभाग उत्पन्न वाढीमध्ये नेहमी अग्रेसर असतो. मात्र, यंदाच्या चिंचली यात्रेदरम्यान जादा एसटी बसेसचे नियोजन करूनही विभागाला गतवर्षीच्या तुलनेत उत्पन्नात ६ लाख ९३ हजारांची घट झाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकांमुळे भाविकांनी यात्रेकडे पाठ फिरवल्याने एसटीला हा तोटा सहन करावा लागला आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

जिल्ह्यात नुकतीच जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडली. ७ रोजी मतदान व ९ रोजी मतमोजणी पार पडली. याच दरम्यानच्या ३ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत चिंचली (ता. रायबाग, जि. बेळगाव) येथील मायक्का देवीची यात्रा पार पडली. या यात्रेसाठी जिल्ह्यातील अनेक भाविक मोठ्या संख्येने यात्रेसाठी जातात. मात्र यावेळी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमुळे भाविकांचा यात्रेला फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे एसटीच्या उत्पन्नातून स्पष्ट झाले आहे.

यंदा सांगली विभागाने चिंचली यात्रेसाठी ७१ जादा बसेसची सोय केली होती. त्यातून २८ लाख ६३ हजार ३०६ रुपये इतके उत्पन्न मिळाले. या काळात २५ हजार ७७५ भाविकांनी एसटीने प्रवास केला. गतवर्षी विभागाने यात्रेसाठी ९७ जादा बसेसचे नियोजन केले होते. त्यातून एसटीला ३५ लाख ५६ हजार ७१३ रुपये इतके उत्पन्न मिळाले होते. तर ३२ हजार ६९१ भाविकांनी प्रवास केला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा विभागाला ६ लाख ९३ हजार ४०७ रुपयांची घट नोंदवली गेली आहे.

आगारनिहाय पाठवलेल्या बसेस व उत्पन्न

आगारवाहनेफेऱ्याकिलोमीटरउत्पन्न एकूण प्रवासी
सांगली२९३५१६१७९३०२२,३८१
मिरज५६३,११९१,४१,५८३२,१४३
ईश्वरपूर२२२५०५१६००९४१५९३
तासगाव१२११६७४९६४६३४४२४७९०
विटा३६३३००१७५८१८१७९६
जत१६२१७०१२४३४३१२४४
आटपाडी२०२५८१४२७३१२१०६७१६३५४
क. महांकाळ४०३४६०१९७०३१२२८९
शिराळा२०२५२०१३११८९२०७७
पलूस१८१५८२७९८३३११०८
------------------
एकूण७१६११४३९४१२८६३३०६२५७७५

गतवर्षीच्या यात्रेतील उत्पन्न

वर्षवाहनेफेऱ्याकिलोमीटरउत्पन्न एकूण प्रवासी
२०२६ ७१६११४३९४१२८६३३०६२५,७७५
२०२५९७५६५ ५००८४ ३५५६७१३ ३२६९१
तफावत२६४६६१४३६९३४०७६९१६
      

Web Title : सांगली: ज़ेडपी चुनाव के कारण चिंचली यात्रा में एसटी राजस्व में गिरावट

Web Summary : सांगली एसटी विभाग का राजस्व चिंचली यात्रा के दौरान 6.93 लाख रुपये घट गया क्योंकि जिला परिषद चुनावों के कारण कम तीर्थयात्री आए। 71 बसें तैनात करने के बावजूद, यात्रियों की संख्या और आय पिछले साल की 97 बसों की तुलना में कम हो गई।

Web Title : Sangli: ZP Elections Cause Dip in Chinchli Yatra ST Revenue

Web Summary : Sangli ST division's revenue declined by ₹6.93 lakh during the Chinchli Yatra due to fewer pilgrims attending because of the Zilla Parishad elections. Despite deploying 71 buses, passenger numbers and income fell compared to last year's 97 buses.

टॅग्स :Sangliसांगली