परीक्षा आणि प्रवेशाचा गोंधळ एकदाचा थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:34 IST2021-06-09T04:34:06+5:302021-06-09T04:34:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गेल्या सव्वा वर्षांपासून राज्यातील शैक्षणिक स्तरावर गोंधळ सुरु आहे, तो एकदाचा थांबवा अशी मागणी ...

Stop the confusion of exams and admissions at once | परीक्षा आणि प्रवेशाचा गोंधळ एकदाचा थांबवा

परीक्षा आणि प्रवेशाचा गोंधळ एकदाचा थांबवा

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गेल्या सव्वा वर्षांपासून राज्यातील शैक्षणिक स्तरावर गोंधळ सुरु आहे, तो एकदाचा थांबवा अशी मागणी विद्यार्थी परिषदेने केली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना सोमवारी निवेदन दिले.

परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, लॉकडाऊनमुळे सर्व महाविद्यालये बंद आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. परीक्षा, निकाल, पुढील प्रवेश, व्यावसायिक शिक्षणक्रमांची प्रवेश प्रक्रिया याबाबतीत विद्यार्थी व पालक संभ्रमावस्थेत आहेत. ऑनलाइन शिक्षण व्यवस्थित व पूर्ण क्षमतेने मिळत नाही. शैक्षणिक वर्ष लांबल्याने नुकसान होत आहे. शैक्षणिक शुल्काच्या नावाखाली वापरत नसलेल्या सुविधांसाठी पैसे वसूल केले जात आहेत.

त्यांनी सांगितले की, परीक्षांचा निकाल, पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. यामुळे विद्यार्थी हतबल झाले आहेत. शासनाने निर्णायक भूमिका घेऊन हा गोंधळ संपवावा. विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.

Web Title: Stop the confusion of exams and admissions at once